Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय संस्कृतीचा वसा आणि वारसा हा मातृसत्ताक-राहुलकुमार चव्हाण


(गोरेवाडी येथे राजमाता अहिल्यामाई होळकर जयंती उत्साहात)
 
सोमनाथ खंडागळे जिल्हा प्रतिनिधी सोलापूर मो. 86002 70199
 
सोलापूर:-भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधान नसून तिचा वारसा आणि वसा हा मातृसत्ताक आहे. यामुळेच प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागे  त्याच्यामागे ठामपणे उभी राहिलेली एक तरी आपल्याला इतिहासात दिसून येते. अहिल्याबाई होळकरांनी  हाच राष्ट्रमाता जिजाऊ, ताराराणी यांचा वारसा पुढे चालवत कर्मकांडी रूढी परंपरांना लाथाडून छत्रपती शिवाजी महाराजांची राजगादी महेश्वरला चालवून एक नवा आदर्श निर्माण केला असे प्रतिपादन प्रा. राहुल कुमार चव्हाण यांनी गोरेवाडी येथे आहे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण मंडळाचे चेअरमन  डॉ. महेश अभंग  होते.
या निमित्त मुंबई पोलिस दलात नियुक्ती झालेल्या कु. वर्षा सतीश गिरमे तसेच इयत्ता दहावीमध्ये 99.40%गुण मिळवून तालुक्यात प्रथम आलेल्या कु.शिवांजली महेश राऊत हिच्या वडिलांचा सन्मान त्याचबरोबर रांगोळी व निबंध लेखन स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना शालेय साहित्य देऊन गौरवण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे मा.श्री.गणेश भाऊ करे पाटील यांनी यश कल्याणी परिवारातर्फे गुणवंत यांना बक्षीस जाहीर करण्याबरोबरच  स्पर्धा परीक्षेमध्ये मुलांनी यशस्वी व्हावे यासाठी महापुरुषांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवावेत. तसेच गोरेवाडी सारख्या छोट्या गावामध्ये असा यशस्वी कार्यक्रम राबवला जाऊ शकतो याबद्दल संयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर महेश कदम यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विचारपीठावर  सौ.ज्योती शिंदे मॅडम,बापूसाहेब,अशोक बंडगर,प्रदीप हाके,रुपचंद गावडे,राजेंद्र अभंग,रोहिदास शिंदे सर,सतीश गिरमे,सुरेश चव्हाण, प्रा. रवींद्र दवणे ,शबिर भाई शेख, हनुमंत हुलगे,दास अप्पा हुलगे,गोरख कारंडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.कारंडे सर यांनी केले.तर सूत्रसंचालन सचिन नवले यांनी केले व आभार रवींद्र दवणे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस देमुंडे,प्रकाश कारंडे,संतोष पारखे,विलास देवकाते,भाऊ गोरे,कल्याण कदम,अप्पासाहेब गोरे, अतुल कारंडे, प्रविण कदम,नवनाथ देमुंडे,सुभाष हुलगे,राजेंद्र पारखे,प्रमोद जाधव, हरिश्चंद्र गोरे,लालासाहेब गोरे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या