Ticker

6/recent/ticker-posts

आमदार सुरेश भोळे जेलमधे जाणार ?

आमदार सुरेश भोळे जेलमधे जाणार ?

      जळगाव शहर मतदारसंघातून सुरेश भोळे यांची आमदारकीची दुसरी टर्म आहे.आता ४०कोटी ४२कोटी,१००कोटी चा निधी येत आहे.हा निधी पुर्ण तर येत नाहीच.यासाठी आधीच ५टक्के नगरविकास मंत्रालयात  मोजून द्यावे लागतात.नंतर १५टक्के डीपीडीसी चे सदस्य वाटून खातात.मक्तेदाराला २०।२५टक्के मार्जीन पाहिजे.म्हणून रस्ते कोते आणि तकलादू बनवून बोगस एमबी भरली जाते.
     जळगाव मधील रस्ते बनवतांना महानगरपालिका अभियंता सोनगिरे म्हणाले कि, आम्ही प्रत्येक रस्त्याचे स्वतंत्र इस्टीमेट बनवून दिले होते.या रस्त्यांचे टेंडर आणि वर्क ऑर्डर सार्वजनिक बांधकाम खात्याने देण्याचे ठरवले आहे.लग्न पोराचे आणि हळद बापाला.सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता प्रशांत सोनवणे यांनी प्रत्येक रस्त्याची स्वतंत्र टेंडर नोटीस काढली पाहिजे.स्वतंत्र वर्क ऑर्डर दिली पाहिजे.पण तसे न करता  ४२कोटीचे ३८ रस्त्याची एकच वर्क ऑर्डर मक्तेदार आदित्य खटोड यांना दिली. विचारले तर म्हणाले कि,हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आदेश आहे.निधी आमदाराच्या नावाने.वर्क ऑर्डर क्लब केली सोनवणे यांनी.हुकूम चालला  गुलाबराव यांचा.उद्घाटन वर फोटो असतो  महाजन यांचा.हे मोठे गौडबंगाल आहे.नव्हे स्कॅंडल आहे.आणि ही संपुर्ण जबाबदारी आहे आमदार सुरेश भोळे यांची.
        आता पुन्हा आमदार म्हणतात कि, आम्ही १०० कोटी आणतो.आणतो म्हणजे मामाच्या गाई विकून आणत नाहीत.हा पैसा आपण नागरिकांच्या कराचाच असतो.तो त्यांचा खाजगी निधी समजतात.मुर्ख लोक मुंडी हलवतात.शहाणे लोक आक्षेप घेतात.४२कोटी मधून ३८रस्ते अजून पुर्ण बनलेच नाहीत, तोपर्यंत आमदार भोळेंनी त्यापैकी चार रस्ते सिमेंटचे बनवायचा घाट घाट घातला आहे.आम्ही जळगाव जागृत जनमंच ने याबाबत आमदार कडे आक्षेप नोंदवला.जनतेच्या कराचा पैसा आहे,असा खेळ खंडोबा करू नका.त्यापेक्षा जे डांबरीकरण करण्याची वर्क ऑर्डर दिली आहे तेच होऊ द्या.नवीन आलेल्या निधीतून नवीन दुसरे रस्ते सिमेंटचे अथवा डांबरी बनवा.पण आमदार म्हणाले कि,आपण सालीच्या नावाने साडी आणू आणि बायकोला देऊ.तेंव्हा आम्ही आमदारांना स्पष्ट शब्दात जाणिव करून दिली कि, तुम्ही चुकीचे काम करीत आहात.एकतर तुम्हाला आमदारकीचे ज्ञान आणि भान नाही.किंवा परसेटेंज वर  समाधान  नाही.लोभात जाऊन तुम्ही हे पाप करू नका. हा मार्ग जेलचा आहे.त्या मार्गाने जाऊ नका .
     जळगाव मधील रस्ते बनवतांना कोणता रस्ता किती लांब,किती रूंद असे कोणतेही टेक्निकल इन्फॉर्मेशन बोर्ड लावलेले नाहीत.आम्ही आमदार भोळे, बांधकाम अभियंता सोनवणे यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले.तरीही नाही.उलट भोळे, महाजन, गुलाबराव, फडणवीस, शिंदे यांनी या रस्त्यांसाठी काय काय बुद्धी वापरली,काय काय क्लृप्ती केली,किती किती गुडगे आणि ढोपरे फोडली ,याची विस्तृत माहितीचे बोर्ड लावले.आम्ही सभ्य भाषेत आक्षेप घेतला.त्यांनी जुमानले नाही.आम्ही असभ्य भाषेत आक्षेप घेतला.लाज वाटली नाही.सार्वजनिक निधीचा असा सार्वजनिक गैरवापर चालू आहे.
     ही  चौकडी एकाच खाटेखालचे चोर आहेत.दुकानात आधी सालदार आला.नंतर मालकाचा मुलगा आला.पाहून घेऊ नये म्हणून सालदार खाटेखाली लपला.नंतर मालक आला.पाहून घेऊ नये म्हणून मुलगा खाटेखाली लपला.मुलगा विचारतो सालदाराला.अरे,तू येथे कशासाठी? म्हणे , तू ज्या कामासाठी आला,त्याच कामासाठी.तोपर्यंत गावचा पाटील आला.त्याने पाहू नये म्हणून मालक खाटेखाली लपला.मालक विचारतो दोघांना, तुम्ही येथे कशासाठी?म्हणे, तुम्ही ज्या कामासाठी आले,त्याच कामासाठी.
      जनतेच्या कराचा पैसा जर अपहार होत असेल, चोरला जात असेल तर आम्ही चक्क चोरी म्हणतो.पोलिस आणि न्यायाधिशांनी सुद्धा याला भ्रष्टाचार न म्हणता चोरी म्हटले पाहिजे.पैसा,वस्तू किंवा जंगम मालमत्ता अफरातफर होत असेल तर ती चोरी असते.म्हणून तसे करणाऱ्याला यापुढे चोर शब्द वापरला पाहिजे.
       सुरेश जैन यांनी झोपडपट्टी उठवण्यासाठी घरकुल बांधले.प्रस्ताव त्यांचाच.मक्तेदार तेच.त्यांनी नगरसेवक नरेंद्र पाटील यांचा विरोध जुमानला नाही .म्हणून घरकुल बांधकाम आणि बांधकाम पेमेंट यातील सहा कोटीचा फरक त्यांनीं पायदळी तुडवला.उशीरा कि असेना असे नियम पायदळी तुडवणे त्यांना खूप महागात पडले.त्याच दिशेने आताचे आमदार सुरेश भोळे जात आहेत.शहरातील ३८रस्त्यांचे इस्टीमेट क्लब का केले? ३८रस्त्यांची वर्क ऑर्डर एकच का दिली? पुर्ण ३८रस्त्यांचे काम एकाच मक्तेदाराला का दिले?असे करण्याचा हेतू काय? विकास कि चोरी? जमीनीवर चे रस्ते आणि कागदावरची एमबी यात तफावत का?काम कमी आणि बील पेमेंट जास्त का? या प्रश्नांची उत्तरे आजही आमदार भोळेंकडे नाहीत.तर कोर्टात कसे देणार?मतदारांची बुद्धी आणि न्यायाधिशांच्या बुद्धीत जमीन अस्मान चा फरक असतो.मतदारांना गणपती उत्सव, शिवजयंती, नवरात्रीला देणगी दिली कि त्यांची बुद्धी भ्रष्ट होते.त्यांना दारू पाजून नाचवता येते.म्हणून ते आमदाराला याबाबत प्रश्न करीत नाहीत.पण आम्ही तर करणारच? जनतेचा कराचा पैसा असा अफरातफर का केला? 
       
.... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या