गुन्हा दाखल करून पारडी पोलीसांनी आरोपीचा शोध घेणे केले सुरु.
भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
नागपूर : नागपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस चोरी, डकैतीचे प्रमाण वाढले आहेत.
गोडाऊन फोडून अज्ञात आरोपीने कोल्ड स्टोअरमधील २.५० लाख रुपये किमतीच्या विलायचीच्या पाच बॅग पळविल्याची घटना पारडी पोलिस ठाण्यांतर्गत १५ फेब्रुवारी २०२२ ते १२ एप्रिल २०२३ दरम्यान घडली. पारडी पोलिस ठाण्यांतर्गत उमीया कापसी येथे हेलिवाल कृषी शितगृह प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे.
संजय चिरंजीवलाल हेलीवाल (वय ५४, रा. हेलीवाल सदन, सुर्यनगर) यांनी कोल्ड स्टोअरमध्ये विलायचीच्या ३७ बॅग ठेवल्या होत्या. अज्ञात आरोपीने गोडाऊनचे कुलुप तोडून त्यापैकी प्रत्येकी २५० किलो विलायची असलेल्या २.५० लाख रुपये किमतीच्या पाच बॅग चोरी केल्या. हेलीवाल यांनी दिलेल्या अर्जाच्या चौकशीवरून पारडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.


0 टिप्पण्या