Ticker

6/recent/ticker-posts

अतिरिक्त घर भड्यासाठी शिक्षकांचे डॉ. फुके यांना निवेदन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :- नक्षलग्रस्त भागातील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत शिक्षकांना मिळणारा अतिरिक्त घरभाडे मार्च २०२३ पासून बंद करण्यात आले. ते पूर्ववत सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ तालुका लाखनी चे वतीने डी.आर. मेश्राम यांचे नेतृत्वात माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना निवेदन देण्यात आले आहे. 
              साकोली विधानसभा क्षेत्राचा समावेश नक्षलग्रस्त क्षेत्रात होत असल्याने या भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना २००८ पासून अतिरिक्त घरभाडे भत्ता देण्यात येत होता. पण तो मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला. अतिरिक्त घरभाडे पुन्हा लागू करण्यात यावे. या करिता माजी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने निवेदन देऊन रविवार(ता.१०) ला चर्चा करण्यात आली. ग्रामविकास मंत्री यांना तत्काळ पत्र देऊन समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन डॉ. परिणय फुके यांनी दिले. शिष्टमंडळात डी.आर. मेश्राम, सिनेट सदस्य मनीष वंजारी, तालुकाध्यक्ष प्रमोदबापू हटेवार, सरचिटणीस उमेश गायधने, शिक्षक नेते विलास टीचकूले, तालुका उपाध्यक्ष राहुल बावनकुळे, विवेक हजारे, प्रवीण खांडेकर, गजिराम खंडाते, दादाराम वंजारी, मेघराज पडोळे, राजकुमार पडोळे, राजकुमार खोब्रागडे, सदानंद वासनिक, जयसिंह राठोड, संदीप खंडाइत, शैलेंद्र राठोड यांचेसह बहुसंख्येने शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या