रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडी गंगापूरच्यावतीने गंगापूर येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. सदरील बैठकीत २० जुलै रोजी मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अँड बाळासाहेब आंबेडकर यांचा नेतृत्वाखाली महामोर्चा काढण्यात येणार आहे, यांत गंगापूर तालुक्यातील गायरान अतिक्रमण धारकांच्या प्रश्नांसाठी सदरील बैठक घेण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष शेख युनुस रज्जाक पटेल होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महिला आघाडीच्या जिल्हा महासचिव सुनयना मगर, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग, शहराध्यक्ष अँड सुशीलकुमार शिराळे, तालुका कार्यकारिणी सदस्य सचिन भुजंग,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा जयाताई सदावर्ते,महिला आघाडीच्या तालुका महासचिव ज्योती मंजुळे, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्षा सविता हिवाळे,मरियान जॉन्सन केजे, सुमनबाई बनकर,छाया वाणी, दिक्षा आळणे,हिरा मुडलिक,मिना बोरूडे,मिरा सोनवणे,सरला जाधव, विजय मंजुळे,मोहन रोडगे, इस्माईल सय्यद, रघुनाथ भालेराव,गोरख शिंदे,आदी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या वेळी गंगापूर तालुक्यातील भिवधानोरा येथील मुस्लिम समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सय्यद इस्माईल हबीब पटेल, गोळेगावचे मोहन रोडगे, गंगापूर शहरातील रघुनाथ भालेराव यांनी वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला त्यांचा जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर यांनी पक्षांचा रुमाल घालून सत्कार केला.


0 टिप्पण्या