Ticker

6/recent/ticker-posts

भीमा कोरेगाव चौकशी आयोगाच्या कामकाजात बाळासाहेब आंबेडकर यांचा सहभाग

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256


  पुणे - 1 जाने 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे झालेल्या दंगलीची चौकशी करणे संदर्भात नेमलेल्या आयोगाचे कामकाज पुन्हा पुण्यात सुरू झाले. न्यायमूर्ती जे. एन. पटेल यांच्या अध्यक्षते खाली सदस्य म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक कामकाज पहात आहेत. 
     बाळासाहेब आंबेडकर यांनी आयोगाचे कामकाजात सहभाग घेतला. त्यांनी या प्रकरणात खूप गांभीर्याने लक्ष घातले आहे. याचे कारण म्हणजे भविष्यात अशा घटना घडूच नयेत, दुर्दैवाने घडल्याचं तर ताबडतोब आटोक्यात याव्यात, हा त्यांचा उद्देश. 
     यावेळी अनौपचारिक चर्चे दरम्यान बाळासाहेब आंबेडकरांनी अनेक उपाययोजना सुचविल्या. आयोगाने या सर्व सूचनांचे स्वागत केले. तसेच या सर्व सूचनांसह प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास सांगितले. दि. २४ जुलै २०२३ रोजी बाळासाहेब आंबेडकर त्यांचे प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करतील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या