Ticker

6/recent/ticker-posts

मनसेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संतोष मगदूम सांगली जिल्हा प्रतिनिधी मो. 9146963985

सांगली जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पर्जन्याची तूट जाणवत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी वर्ग संकटात सापडला आहे. अति पर्जन्यमान म्हणून ओळख असलेल्या शिराळा तालुक्यासह काही इतर भागात भाता, मका व भुईमूग पेरण्या व लागवडी आटपल्या आहेत पण पावसाअभावी ही पिके आता धोक्यात आली आहेत. दरवर्षी जून मध्ये येणार मान्सून अर्धा जुलै ओलांडला तरीही पडलेला नाही. त्यामुळे आष्टा इस्लामपूर भागात ही ऊस पीक धोक्यात आले आहे. काही तालुक्यात भूजलाची कमतरता भासू लागली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न देखील निर्माण होऊ लागला आहे. सदर बाब अत्यंत चिंता जनक आहे.

जत सह इतर तालुक्यात खरीप पिके पावसा अभावी धोक्यात आली असून (बाजरी, उडीद, तूर, मका, सोयाबीन) या पिकासाठी दुबार पेरणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी पेरणी केलेल्या पिकाला पाऊस नाही तर काही ठिकाणी पावसाअभावी पेरणी रखडली आहे. सदर परिस्थितीमुळे जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडला असून मोठ्या प्रमाणात खत व बियाणे साठा पडून राहिला आहे.

तरी जिल्ह्यातील सदर परिस्थितीचा विचार करून कृत्रिम पद्धतीने पाऊस पाडून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अन्यथा पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरता, दुरसंवेदना विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आद्रता पेरनिखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावित झालेल्या जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये दुष्काळ जाहीर करावा .अशी मागणी करण्यात आली. ह्यावेळी मनसे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत व शहराध्यक्ष दयानंद मलपे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या