Ticker

6/recent/ticker-posts

मौजा दहेगाव मुरमाडी येथील अपंग,दिव्यांग २३ वर्षीय महिलेवर अज्ञात इसमाने केले शारिरीक अत्याचार

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा : भंडारा जिल्हा लाखांदूर तालुक्यातील मौजा दहेगाव मुरमाडी येथील २३ वर्षीय महिलेवर अज्ञात इसमाने शारीरिक शोषण करून, मारपीट केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
   सविस्तर हकिकत असे की, मौजा दहेगाव / मुरमाडी, तालुका लाखांदूर , जिल्हा भंडारा येथील २३ वर्षीय एका दिव्यांग महिलेवर रस्त्याने जात असताना हि रस्ता कुठे जातो. अशी माहिती एका सुशिक्षीत तरुणाला विचारले असता. मौक्याचा फायदा घेऊन त्या तरुणाला असे लक्षात आले की, सदर महिला ही अपंग व दिव्यांग आहे. आणि तिला रस्ता दिसत नसल्याने ती बोलु शकत नाही. याचा फायदा घेऊन , उच्चशिक्षित नराधमाने सदर पीडित महिलेला जंगलाच्या दिशेने नेऊन तिच्यावर अमानुष रितीने शारीरिक अत्याचार करून, मारहाण केली. व पीडित महिलेला जखमी करून घटनास्थळावरून पसार झाला. ही घटना दिनांक १९ जुलै २०२३ रोजी घडल्याची सविस्तर माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 
   सदर उच्चशिक्षित नराधमाला पोस्को कायद्या अंतर्गत कडक कार्यवाही करून सदर पीडित महिलेला न्याय द्यावा असे लेखी निवेदन मा.श्री. मदन भाऊ रामटेके जि. प. सभापती समाज कल्याण, सौ.स्वातीताई वाघाये सभापती महीला व बालकल्याण , सौ.विद्या कुंभरे जि.प. सदस्य पोहरा . मा.श्री. रक्षित मेश्राम काँग्रेस प्रतिनिधी लाखांदूर तालुका यांनी पोलीस अधीक्षक साहेब भंडारा जिल्हा यांना दिले आहे. पीडित महिलेवर झालेल्या अत्याचाराचे दोषींवर कारवाई करून, अटक करण्यात यावे. व पिडीत महिलेला न्याय मिळावा करिता निवेदन दिले आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात होणार अशी समज दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या