चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्यूज मो.८८८८७९७५
माढा - वंचित बहुजन आघाडी माढा लोकसभेच्यावतीने कुर्डुवाडी उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मुस्लिम व बहुजनांवरती होणाया अन्याय अत्याचाराच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सद्यस्थितीला "महाराष्ट्रात मुस्लिम आणि बहुजनांवर होणाया अत्याचारात वाढ झालेली आहे, तसेच हे अन्याय-अत्याचार वेळीच रोखले नाहीत तर राज्यात अराजकता माजेल, त्यासाठी वचित बहुजन आघाडीच्यावतीने आज कुर्डुवाडी प्रांत कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
मोर्चात परळी येथील जरीन खानचा पोलीस कोठडीत खून करणार्या पोलीस कर्मचायांवर सदोष मनुष्यवधाचा 302 प्रमाणे गुन्हा दाखल करून दोषींना सेवेतून बडतर्फ करावे. जरीन खानच्या कुटुंबाला 50 लाखाची शासकीय मदत मिळावी. नांदेड जिल्हयातील बोंढार गावच्या अक्षय भालेरावच्या हत्येचा गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा. रेणापुर येथील मातंग बांधवाचा खुन करणार्यांना फाशीची शिक्षा मिळावी. तसेच महाराष्ट्रामध्ये वाढत्या अत्याचाराला आळा घालावा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचितचे जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांनी दिला.
यावेळी कुर्डुवाडी शहराचे मा. नगरअध्यक्ष समिर (भाई ) मुलाणी,जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, युवा जिल्हाध्यक्ष साहेबराव वाघमारे जिल्हा उपाध्यक्ष सत्यवान हांडे जि. उपाध्यक्ष एम्. बी. कांबळे, प्रदिप सोनटक्के, विजय (भाऊ) कोकणे, पांडुरंग केंगार, राजेंद्र गुलीग, सुदेशना बडेकर, नौशाद शिकलकर, राजकीरण ओहळ, सुभाष ओहळ, हनुमंत जगताप, वंचित बहुजन आघाडी माथाडी कामगार व ट्रान्सपोर्ट युनियनचे जिल्हाध्यक्ष विवेक वाघमारे, जालींदर (नाना) गायकवाड, अभिमान जगताप बाबासाहेब ओहळ, लालासाहेब मुलाणी, विलास कांबळे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख राज वाघमारे, जिल्हा कार्यकारणी सदस्य औदुंबर लेंगरे पाटील, अभिजित गायकवाड, नवनाथ साळवे, विशाल लोढे, सुरेश मोठे, कुर्डुवाडी शहराचे महासचिव अश्पान (भाई) तवक्कल, माढा तालुक्याचे युवा नेते महादेवजी साबळे, माजी जिल्हाध्यक्ष गोपाळ घार्गे व आजी, माजी पदाधीकारी ग्रामशाखेचे पदाधिकारी मोठ्या संख्येन उपस्थीत होते.


0 टिप्पण्या