Ticker

6/recent/ticker-posts

बिबट्याचे हल्ल्यात शेळी ठार

• किंन्ही कक्ष क्रमांक ३१५ मधील घटना 

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा :- सहवन क्षेत्र लाखनी चे अधीनस्त वनरक्षक बीट गडेगाव मधील नियतक्षेत्र कींन्ही च्या कक्ष क्रमांक ३१५ मध्ये बिबटाने शेळीस ठार केल्याची घटना रविवारी(ता.१६) सायंकाळचे सुमारास उघडकीस आली. पशुपालक पंकज अरुण धांडे यांचे अंदाजे ७ हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले यांचे मार्गदर्शनात पंचनामा करण्यात आला आहे. या घटनेने गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 
            पंकज धांडे हे अल्पभूधारक शेतकरी असून शेतीस पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन करतात. त्यांचेकडे आजघडीस ८ म्हशी, ३ गायी, ४ शेळ्या आहेत. ते स्वतः जनावरे राखण्याचे काम करतात. नेहमीप्रमाणे रविवारी त्यांनी जनावरे जंगला लगत चारण्यासाठी नेले असता झुडपात दबा धरून बसलेल्या बिबटाने अचानक शेळीवर हल्ला करून ठार केले. त्यांनी घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले यांना दिली. त्यांनी गडेगाव चे वनरक्षक मंगला शहारे व लाखनी चे वनरक्षक त्रिवेणी गायधने यांना घटनेची माहिती देऊन पंचनामा करण्याच्या सूचना केल्याने त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आजूबाजूला असलेल्या पायाचे ठस्यावरून शेळीवर हल्ला करणारा बिबट असल्याचे निष्पन्न झाले. ४ दिवसापूर्वी बिबटाचे हल्ल्यात गोंडसावरी येथील पशुपालक जखमी झाला होता. लागोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनक्षेत्रालगत शेतजमिनी असून सध्या रोवणी चा हंगाम असल्याने शेतकऱ्यांसह मजूर दिवसभर शेतात काम करीत असतात भविष्यात एखादी मोठी अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करणे आवश्यक झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या