Ticker

6/recent/ticker-posts

दुचाकी चोरट्यास गावकऱ्यांनी पकडून दिला चोप


• मुंडीपार/सडक येथील घटना 

• लाखनी पोलिसांत गुन्हा दाखल

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324

भंडारा:- घराचे पोर्च मध्ये ठेवलेले पांढऱ्या रंगाची जुनी होंडा ॲक्टिवा क्रमांक एमएच ३६ आर ६४२४ कोणीतरी अनोळखी इसम चोरून घेऊन जात असताना गावकऱ्यांनी पकडून चांगला चोप दिल्याची घटना मुंडीपार/सडक येथे रविवारी(ता.१६) मध्यरात्री दरम्यान उघडकीस आली. राहुल लांडगे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून चोरास अटक केली आहे. चोराचे नाव धम्मराज नेमीचंद मेश्राम(२३) रा. सेलोटी, तालुका लाखनी असे आहे. पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे. 
            राहुल लांडगे हा कुटुंबीयासोबत आपले घरी झोपला असताना रात्रीचे सुमारास कोणीतरी आवाज देऊन दार ठोठावले असता राहुल चे आईने दरवाजा उघडला असता त्याचा मित्र पवन डहारे दिसला. त्याने तुझी दुचाकी घरी आहे का असे विचारल्यावर त्याने पोर्च मध्ये ठेवलेली दुचाकी पहिली. पण दिसून आली नाही. तेव्हा मित्राने तुझी दुचाकी ग्रामपंचायत जवळील पानठेल्या समोर उभी असल्याचे सांगितल्याने राहुल कुटुंबीयासह ग्रामपंचायत जवळ आला असता दुचाकी व लगत एक अनोळखी इसम दिसला. त्याला नाव गावाबाबद विचारणा केली असता उडवाउडवी चे उत्तरे देऊ लागल्याने गावकऱ्यांनी त्यास पकडले व चांगला चोप दिला. पोलिस पाटील यांना घटनेची माहिती दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ पोलिस घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी त्या अनोळखी इसमास विचारणा केली असता नाव, गाव सांगितले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. राहुल लांडगे यांचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २८२/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला. कलम ३७९, ५११ भादवि अन्वये पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस हवालदार निलेश रामटेके तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या