Ticker

6/recent/ticker-posts

मांडकी गावच्या रणजित रणनवरे याची पीएसआय पदी निवड झाल्याबद्दल नागरी सत्कार

सोमनाथ खंडागळे सोलापूर जिल्हा प्रतिनिधी मो.8600270199


 सोलापूर -: मांडकी (ता.माळशिरस) येथील रणजित युवराज रणनवरे यांची एमपीएससी परीक्षेत यश संपादन करून पीएसआय पदी नुकतीच निवड झाल्याबद्दल मांडकी ग्रामस्थाच्या वतीने त्याचा जाहीर नागरी सत्कार करण्यात आला.
          त्यावेळी सत्काराला उत्तर देताना रणजीत रणनवरे म्हणाले की,बीएससी ॲग्री शिक्षण पुर्ण झाल्या नंतर कोणतीही टयूशन न लावला घरी राहुन अभ्यास केला पहिल्याच प्रयत्नात एमपीएससी परीक्षे यश संपादन केले आहे.आई वडिलांचे कष्ट हिच माझ्या यशाची प्रेरणा होती,त्यातून जिद्द,चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.
            यावेळी डॉ.शिरीष रणनवरे यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की, रणजीत रणनवरे याने केवळ त्यांच्या आई-वडिलांचे नव्हे तर समस्त मांडकी गावाचे नाव मोठे केले आहे.या पुढे तरूण पिढीने एमपीएससी व युपीएससीमध्ये असे यश संपादन करून आपल्या गावाची ओळख अधिकाऱ्यांचे गाव म्हणून व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली.
          याप्रसंगी रणजीत रणनवरे यांचा सत्कार डॉ.शिरीष रणनवरे यांच्या हस्ते करण्यात आला.त्याच्या आई-वडीलांचा सत्कार ही मांडकी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.रणजीतचे वडील युवराज रणनवरे यांचा सत्कार सोसायटीचे चेअरमन यशवंत भानुदास रणनवरे यांनी केला तर रणजितच्या आई सौ. वंदना रणनवरे यांचा सत्कार मांडकी गावच्या सरपंच सौ. मनिषा बोडरे व उपसरपंच रूपाली निंबाळकर यांनी केला.याप्रसंगी यशवंत भानुदास रणनवरे यांनी मनोगत व्यक्त केले.
       या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन अंकुश रणनवरे यांनी केले.तर शेवटी युवा नेते तानाजी रणनवरे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या