भो पुरूषा,भल्या माणसा जळगाव शहरातील तांबेपुरा, मेहरूण प्रभाग मधे फुकटपुरा वस्ती आहे.ही जमीन कोणत्यातरी खाजगी मालकाची आहे.ती जमीन एकाने दुसऱ्याला , दुसऱ्या ने तिसऱ्याला विकली.ही जमीन खाली करण्याची अक्कल,नक्कल, शक्कल ज्याला असेल तो विकसित करील.या दिशेने येथील रहिवाशांना पळवण्याचा घाट घातलेला आहे.त्याचाच एक भाग,एक ट्रायल, पहिला एपिसोड १२जुलै ला दाखवला गेला.
घरमे घुसा पाणी और घाण,
बच्चे और बीबी दाणाफाण!
जळगाव ते पाचोरा स्टेट हायवेला लागून असलेला हा भाग.आता पाचोरा स्टेट हायवे सिमेंट चा बनवला.रस्त्याचे भाग्य उजळले पण रहिवाशांचे दुर्भाग्य घेऊन आले.आदर्शनगर, गणपती नगर असे अर्धे जळगाव चे गटार व पावसाचे पाणी बळजबरीने अनैसर्गिक पद्धतीने , अनैतिक पद्धतीने वळवून तांबेपुरात आणून सोडले.येणारी गटार दोन्ही बाजूंनी साडेतीन तीन फूट.पण तांबेपुरातील गटार फक्त दोन फुट.साडेतीन फुटांच्या दोन गटारींचे म्हणजे सात फुट गटारीतून येणारे पाणी दोन फूट गटारीतून कसे पास होईल.तो काय गॅस आहे,कॉम्प्रेस होईल ?ते तर बळजबरीने ओव्हरफ्लो होऊन रस्त्यावर, गल्लीत,घरात, दुकानात शिरेल.म्हणून एक महिन्यापुर्वीच यावर आक्षेप घेतला.तरीही आयुक्त व महापौर म्हणाले,हेच बरोबर आहे.
आला पहिला पाऊस.भरून आल्या दोन्ही कडून गटारी.शिरल्या तांबेपुरात.घरादारात.दुकानात.खाटलेभी भिजले, अंथरूण भी भिजले.गहू भी भिजला, साखर भी विरघळली.लोक पळाले पोरगं, बकरी, कोंबडी घेऊन.जिकडे तिकडे घरादारात पाणीच पाणी.साहेबाचे कोणी साहेब नसते.साहेबाला काळीज नसते.त्याला फक्त रुबाब असतो.मिजाज असतो.त्यांना काय फरक पडतो?ते असतील कुठे तरी बार मधे किंवा कडी घालुन बंद दार मधे.हा प्रकार रात्री घडला.सकाळी जेसीबी आले.हायवे खालचे पाईप कोरले.तेंव्हा कुठे पाणी ओसरले.
आम्ही जळगाव जागृत जनमंचने पुन्हा उजळणी केली.ही बाब येथील नगरसेवक, महापौर, आमदार, आयुक्त यांच्या लक्षात आणून दिली.पण त्यांनी कानाडोळा केला.
आज पुन्हा आम्ही माजी महापौर श्री नितीन लढ्ढा यांच्या माध्यमातून सिटी इंजिनिअर श्री सोनगिरे यांना स्पॉट इन्स्पेक्शन साठी बोलवले.ते आले.त्यांना परिस्थिती चे गांभीर्य लक्षात आले.म्हणाले की,इकडे येणाऱ्या दोन्ही गटारी आता आदर्श नगर किंवा गणपती नगर मधे परत माहेरी जाणार नाहीत.तर आपण त्यांना मेहरूण च्या नाल्यात सुखरूप सोडून देऊ.स्थानिक नागरिकांनी मान्य केले.तसेच येथे ईच्छा देवी ते डी मार्ट पर्यंत तुर्त एका बाजूने फुटपाथ बनवून देऊ.आपण नागरिकांनी मागणीचे निवेदन दिले तर येथे स्पीड ब्रेकर ची अनुमती घेऊन लावून देऊ.
जळगाव महापालिकेतील नगरसेवक निधीसाठी,मक्तासाठी, ओपन स्पेश साठी हाणामारी करतात.पण मतदारांसाठी त्यांचेकडे वेळ नाही.कदाचित नगरसेवक हे मतदारांना गृहीत धरत असावेत.कुठे जातील?पांचशे ची नोट काढली की, आपल्यालाच मत देतील.मतदारांची ही कमजोर नस पकडून जळगाव चे नगरसेवक निवडून येतात.म्हणून आम्ही येथील मतदारांना सांगितले की,तुम्हारी किंमत एक मुर्गी बराबर पकडी है.इसलिये वो बेफिकीर है.
नागरिकांची फजिती आणि नगरसेवकांची बेफिकीरी पाहून आम्ही जालीम इलाज सांगितला की, यापैकी कोणताही नगरसेवक पुन्हा निवडून देऊ नका.तरच तुमची किंमत इन्सान बरोबर केली जाईल.तोपर्यंत नाही.सोच लो!पांचसौ रुपया चाहिए या पांच साल सेवक चाहिए?
लोकांनी जोरात आवाज दिला,
" हमे नगरसेवक बदलना है!"
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या