Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थी व प्रवासांना होतोय त्रासतुमसर बस स्थानकात बस फेऱ्या कमी असल्याने प्रवाशांचा असंतोष

भवन लिल्हारे उपसंपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847
भंडारा :- भंडारा जिल्ह्यातील तुमसर ते बावनथडी -लोभी मार्गावर येणाऱ्या बस फेऱ्या वेळापत्रकानुसार न आल्याने आणि बस फेऱ्या कमी झाल्याने प्रवाशांना आणि शालेय विद्यार्थ्यांना खुप त्रास सहन करावा लागत आहे.
असाच एक प्रकार दिनांक ०४/०७/२०२३ ला सकाळी तुमसर ते लोभी बस वेळेवर न येऊन सुध्दा “वापसी मध्ये लोभी ते तुमसर ला जातांना” आष्टी वरुन निघतांना रस्त्याच्या मधोमध बस ड्रायव्हर ने एका घराच्या समोर बस थांबवुन प्रवाशांचा व विद्यार्थ्यांचा अर्धा तास वेळ गमावला. त्यामुळे काही विद्यार्थी परिक्षार्थी होते. तर काही प्रवासी कामानिमित्त बाहेर जात होते. त्यामुळे वेळेवर न पोहचल्याने विद्यार्थी व प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागला. ही माहिती एसटी आगारातील जीभकाटे साहेब,सागर मलघाटे साहेब व डेपो मॅनेजर, मॅडम ला सुध्दा मोबाईल फोन द्वारे देण्यात आली.
बातमी प्रकाशित होताच एस टी महामंडळ तुमसर व महाराष्ट्र परिवहन महामंडळ भंडारा यांनी बस ड्रायव्हर वर उचीत कार्यवाही करुन बस फेऱ्यांमध्ये वाढ करावी. अशी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या