Ticker

6/recent/ticker-posts

SRA मधील 4 वर्ष रखडलेला प्रश्न वंचित बहुजन आघाडीमुळे 1 महिन्यात सुटला


मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो, 9860179256


पुणे :- भवानी पेठ पुणे येथे झोपडपट्टी पूनर्विकास (SRA) मार्फत सिद्धार्थ_हौसिंग_सोसाइटी (मंजुळाबाई चाळ) ही रहिवासी इमारत उभारण्यात आली होती या इमारतीच्या बाजूच्या मोकळ्या जागेत महावितरण मार्फत 10-12 वर्षापूर्वी मोठ्या क्षमतेचे रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) शेड मधे बसविण्यात आले आहे सदर शेडवरील पत्रे व शेडचे शटर काही वर्षांनी कुजून तुटले त्यामुळे पावसाळ्यात शटरमधे पाणी जाऊन आग लागण्याचा धोका व लहान मुले तिथे खेळत असतात त्यांच्या जीवाला सुद्धा धोका निर्माण झाला होता* सदरील बाब ही सोसायटीच्या सभासदांच्या लक्षात आली असता त्यांच्या मार्फत 25/06/2019 पासून तक्रारी करिता महावितरण अधिकाऱ्यांसोबत पत्र व्यवहार व फोन वर चर्चा सुरू होती पण अधिकारी त्यांच्या तक्ररीस दाद देत न्हवते याची तक्रार सोसायटीमधील सदस्य व नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीकडे केली असता वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहर सचिव स्वप्निल वाघमारे मार्फत व मंजुळा बाई चाळ मधील डॉ. आंबेडकर युथ मंडळाचे अध्यक्ष मंगेश जगताप यांच्या कडुन सदर प्रकरणाचा पाठपुरावा व पत्रव्यवहार करून जाब विचारण्यात आल्यानंतर महावितरणा मार्फत महिन्या भरात ट्रान्सफॉर्मरवरील पत्रे बदलुन देण्यात आले ..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या