Ticker

6/recent/ticker-posts

उस्मानाबाद भारतीय बौद्ध महासभेकडून आण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- दि 01 ऑगस्ट 2023,लोकशाहीर, साहित्यरत्न..
मा.तुकाराम भाऊराव साठे (आण्णाभाऊ साठे ) जयंत्ती निमित्त, उस्मानाबाद शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णांकृती पुतळ्या जवळ भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्यरत्न,आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे,सदाशिव गवळी साहेब,समता सैनिक दलाचे सचिव सचिन दिलपाक,भारतीय बौद्ध महासभेचे ता. संघटक महादेव ऐडके,युवराज पौळ,पृथ्वीराज चिलवंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.तर अभिवादन कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप भारतीय बौद्ध महासभेचे जि.संघटक विजय बनसोडे यांनी केला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते कुंदन चिलवंत,पर्यटन सचिव धनंजय वाघमारे,ता.संस्कार सचिव शशिकांत माने,ऍड. प्रबुद्ध कांबळे,आर पी आय चे सोमनाथ गायकवाड, गणेश वाघमारे, संजय गजधने, अनुराथ नागटिळक, बाळासाहेब शिंदे,मुकेश मोटे,बाबासाहेब कांबळे,रोहित गायकवाड,प्रभाकर सोनवणे,अर्जुन ओहाळ यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थित होती.तर शेवटी मोठया उत्साहात आण्णाभाऊ साठेंचा जयघोष करून मिठाई वाटप करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या