Ticker

6/recent/ticker-posts

संगणक परिचालकाच्या मृत्यूस जबाबदार व्यक्तीवर कारवाई करा


• लाखनी तालुका ग्रामपंचायत संगणक परीचालकांचे बीडीओ ला निवेदन 
लाख

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324


भंडारा:- तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकास तालुका स्तरावर १००-२०० एंट्र्या  झाल्या नाही तर कामावरून काढून टाकण्याची व्हॉट्स ॲप वरून धमकी देणे, अधिकचे काम करवून घेणे, प्रामाणिक काम करणाऱ्यास काढून नवीन परिचालक निवड करणे या प्रकाराला कंटाळून जिल्हा नांदेड बिलोली तालुक्यातील हिप्परगाथडी ग्रामपंचायतीचे संगणक परिचालक अंबादास पेटेकर यांनी ग्रामपंचायत कार्यालयात आत्महत्या केली. यास जबाबदार असणाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या करिता लाखनी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने सोमवारी(ता.१४) लाखनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना निवेदन देण्यात आले. 
              ग्रामविकास विभागामार्फत प्रत्येक ग्रामपंचायतीत आपले सरकार सेवा केंद्र मागील १४ वर्षापासून सुरू असून एस.पी. कंपनी चे वतीने संगणक परीचालकाची निवड करण्यात येते. मागील १४ वर्षापासून ६ हजार ९३० रुपये ह्या तुटपुंज्या मानधनावर संगणक परिचालक कार्यरत असून त्यांचेकडून ऑनलाईन व ऑफलाईन काम करवून घेण्यात येते. मानधनही चार-चार महिने मिळत नाही. त्यातच एसपी कंपनीचे तालुका स्तरावर १०० ते २०० एंट्र्या झाल्या नाही तर कामावरून कमी करण्याची व्हॉट्स ॲप वरून धमकी देणे, अतिरिक्त काम करवून घेणे, प्रामाणिकपणे काम करणाऱ्यास काढून नवीन परिचालकाची निवड करणे, कार्यालयात बसू न देणे. या प्रकाराने संगणक परिचालक मानसिक तणावात येऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. ग्रामपंचायत हिप्परगाथडी, तालुका बिलोली, जिल्हा नांदेड येथील संगणक परिचालक अंबादास पेटकर यांनी आत्महत्या केली. यास जबाबदार व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करावी. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये. या करिता शासन स्तरावर ग्रामपंचायतीच्या सुधारित आकृतीबंधात संगणक परिचालकास कर्मचाऱ्याचा दर्जा देऊन किमान वेतन सुरू करण्यात यावे. या मागणी करिता लाखनी तालुका संगणक परिचालक संघटनेच्या वतीने लाखनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनाच्या प्रतीलीपी मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी(पंचायत) जि.प. भंडारा, कक्ष अधिकारी ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई-३२, पोलिस अधीक्षक भंडारा, पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे लाखनी यांचेकडे पाठविण्यात आल्या असून निवेदनावर तालुकाध्यक्ष रूपवसंत मोहतुरे, उपाध्यक्ष सुरेश कठाने, सचिव योगेश अतकरी यांच्या स्वाक्षऱ्या असून निवेदन देतेवेळी बहुसंख्येने संगणक परिचालक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या