• माजी जि. प. सदस्य आकाश कोरे यांचे मागणी
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा:- वन विकास महामंडळाचे अधिनस्त सोनेगाव सहवनक्षेत्रातील नीलागोंदी कक्ष क्रमांक १८३ मध्ये पट्टेदार वाघाने गायीस ठार केल्याने पशुपालक होमराज हटवार रा. नीलागोंदी यांचे ५३ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचा क्षेत्र सहाय्यक चारुलता मोहरकर , वनरक्षक स्नेहल कपाळे यांनी पंचनाम्यात नमूद करून अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला असल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यास वन विकास महामंडळाने नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.
सध्या धान शेती परवडेनासी झाली असल्यामुळे शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी दुग्ध व्यवसायाकडे वळला असून त्याकरिता गायी, म्हशी पाळणे सुरू केले आहे. होमराज हटवार ह्या अल्प भूधारक शेतकऱ्याकडे ३ गायी, १ गोरी व ४ शेळ्या असून तेच पाळीव जनावरे राखणीचे काम करतात. वनक्षेत्रालगत जनावरे चारण्यासाठी नेले असता पट्टेदार वाघाने जनावरांच्या कळपावर हल्ला केला. त्यामुळे जनावरे इतरत्र पळून गेली. पण रात्री चे सुमारास होमराज हाटवार यांची दुभती गाय घरी आली नाही. त्यामुळे सकाळी शोधाशोध केली असता कक्ष क्रमांक १८३ मध्ये मृतावस्थेत दिसून आली. आजूबाजूला पट्टेदार वाघाचे पागमार्क आढळून आल्याने पट्टेदार वाघानेच गायीस ठार केल्याने वन परिक्षेत्र अधिकारी वन विकास महामंडळ सोनेगाव(चंद्रपूर) यांना घटनेची माहिती दिली. क्षेत्र सहाय्यक चारुलता मोहरकर, वनरक्षक स्नेहल कपाळे यांनी घटनास्थळी जाऊन मृत गायीचा पंचनामा करून ५३ हजाराचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आल्याने वन विकास महामंडळाने अल्प भूधारक शेतकरी होमराज हटवार यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.
0 टिप्पण्या