• ग्रामपंचायत सदस्य यशवंत खेडीकर यांचे बीडीओ ला निवेदन
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा:- गट ग्रामपंचायत पोहरा ने चालू आर्थिक वर्षात घर कर व पाणीपट्टी करात अवाजवी वाढ केली असल्याने ग्रामस्थांचे आवाक्याबाहेर असल्याने ही कर वाढ कमी करावी. या करिता ग्रामपंचायत सदस्य यशवंत खेडीकर यांनी गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना निवेदन दिले आहे.
गट ग्रामपंचायत पोहरा चे कार्यक्षेत्रात मेंढा व गडपेंढरी ही गावे समाविष्ट असून लोकसंख्या अंदाजे ७ हजार असून कुटुंब संख्या अंदाजे १४५० आहे. ग्रामपंचायतीचे वतीने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कर पुनररचना करण्यात आली. त्यात अवाजवी घर कर आणि पाणीपट्टी करात वाढ करण्यात आली. गावात दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन व अल्प अत्यल्प शेतकरी कुटुंबांची संख्या अधिक असल्याने त्यांना हा वाढीव कर भरणे अशक्यप्राय बाब झाली आहे. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या आर्थिक स्थितीचा विचार करून घर कर व पाणीपट्टी करात केलेली अवाजवी करवाढ मागे घेण्यात यावी. या करिता गटविकास अधिकारी अरुण गिरेपुंजे यांना ग्रामपंचायत सदस्य यशवंत खेडीकर यांनी निवेदन दिले आहे. पंचायत समिती स्तरावरून काय भूमिका घेतली जाते. याकडे ग्रामवासी जनतेचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया
पोहरा ग्रामपंचायतीने केलेल्या करवाढी संबंधी ग्रामपंचायत सदस्य यशवंत खेडीकर यांचेकडून निवेदन प्राप्त झाले आहे. चौकशी संबंधाने विस्तार अधिकारी पंचायत यांना सूचना केल्या आहेत.
अरुण के. गिरेपुंजे, गटविकास अधिकारी, प.स. लाखनी
0 टिप्पण्या