Ticker

6/recent/ticker-posts

अवैध दारू विक्रेत्याला जिल्ह्यातून हद्दपार करा

• मुरमाडी/तूप व रामपुरी ग्रामस्थांचे पालांदुर ठाणेदारास निवेदन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324


भंडारा :-लाखनी तालुक्यातील पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रामपुरी येथील अवैध दारू विक्रेता अमर राजू शिंदे हल्ली मुक्काम सायगाव(गोंदी) हा दिघोरी फाट्याजवळ रामपुरी येथे दारू विक्री करतांना आढळल्याने मुरमाडी चे सरपंच सुषमा चुटे यांनी पकडले असता अशोभनीय व्यवहार केल्याने पालांदूर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराने चिडून जाऊन अवैध दारू विक्रेत्याने सरपंच पतीवर खोटा गुन्हा दाखल केल्याने शांतता व सुव्यवस्थेचा विचार करून अवैध दारू विक्रेत्यास हद्दपार करावे. या करिता मुरमाडी/तूप व रामपुरी ग्रामस्थांचे वतीने पालांदूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांना निवेदन देण्यात आले आहे. 
             पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मुरमाडी/तूप व रामपुरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू होती. या गावच्या ग्रामपंचायतीत ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव घेण्यात आला. त्या त्या गावातील सरपंच, सदस्य, तमुस अध्यक्ष, पोलिस पाटील व गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन दारू बंदी केली. त्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्था नंदू लागली. भुरट्या चोऱ्यांच्या प्रमाणात घट झाली. पण अमर राजू शिंदे दोन्ही गावातील दारू विक्रेत्यांना अवैध दारू आणून देणे व विक्री करण्याचे काम करायचा त्यामुळे गावातील लोकांनी त्याची दिघोरी फाटा रामपुरी येथे दारू पकडली. दारू पकडतांना मुरमाडी/तूप चे सरपंच सुषमा चुटे यांना ढकलढुकल करून पळून गेला. त्यामुळे त्याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने चिडून जाऊन महिला सरपंचाचे पतीसह इतर दोघांची मारझोड केल्याची तक्रार देऊन खोटा गुन्हा दाखल केला आहे. अवैध दारू विक्रेता अमर शिंदे याचे खून प्रकरणात नाव आले होते. तसेच दारू विक्रीबाबद अनेक गुन्हे दाखल असून तो कुणालाही धमकी देणे, खोट्या तक्रारी करणे सुरू आहे. त्यामुळे गावात दारू बंदी करणे अवघड झाले आहे. गावातील शांतता व सुव्यवस्था भंग होऊ नये. या करिता त्याला जिल्ह्यातून हद्दपार करावे. या करिता मुरमाडी/तूप व रामपुरी येथील ग्रामस्थांनी पालांदूर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक विरसेन चहांदे यांना निवेदन दिले आहे. प्रकाश चूटे,मेघनाथ मेश्राम, कैलास कठाने, तुषार चूटे, कैलास बावनकुळे, अतुल गिरेपुंजे, सुषमा चुटे, मनीषा वालोदे, प्रतिभा बावनकुळे, माधुरी रामटेके, शीतल गोधे, स्वाती चूटे, बेबी राऊत, गया चुटे, ललिता मुलुंडे, सुरेखा धोटे, मिरा धोटे, बाळकृष्ण नेवारे यांचेसह गावकऱ्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या