कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- रोवणी चे कामासाठी आलेल्या मजुरांचा तोल जाऊन विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या दयाराम चोलीराम भोंडे(३५), मंगेश जयगोपल गोंधळे(२६) रा. मेंढा/भूगाव यांचे निराधार कुटुंबास मुरमाडी/तूप चे जिल्हा परिषद सदस्य गजानन(गणेश) निरगुळे यांनी संत्वणापर भेट देऊन आस्थेने विचारपूस करून अर्थसहाय्य केल्याने मानवतेचे दर्शन घडविल्याने त्यांचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.
मृतक दयाराम भोंडे व मंगेश गोंधळे हे सहकारी मजुरांसह विष्णुदास गायधने राहणार गडपेंढरी या अल्प भूधारक शेतकऱ्याकडे रोवणी चे कामासाठी गेले होते. रोवणी साठी बांधीत उतरत असताना धुऱ्यालगत असलेल्या विहिरीत तोल जाऊन पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. मृतक दयाराम भोंडे यास पत्नी व लहान मुलगा असून मंगेश गोंधळे हा अविवाहित असून कुटुंबात वयोवृद्ध आई-वडील आहेत. दोघेही मृतक घरचे कर्ते पुरुष असल्याने अकाली निधनाने त्यांचे कुटुंब उघड्यावर आले होते. ही बाब जिल्हा परिषद सदस्य गजानन(गणेश) निरगुळे यांना समजताच लोक प्रतिनिधी या नात्याने त्यांचे कुटुंबास हातभार लावण्याचे उद्दात्त हेतूने मृतकांचे घरी गावातील पदाधिकाऱ्यासमक्ष जाऊन सांत्वण केले. तथा कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून अर्थसहाय्य केले. यावेळी मेंढा/भूगाव च्या सरपंच नलिनी बारसे, उपसरपंच चेतन हजारे, ग्रामपंचायत सदस्य जेठमल चौबे, मेघश्याम कावरे, रोहिणी आंबेडारे, लोभाताई चूटे, मिलिंद बारसे, मारोती ठाकरे, निमगाव चे माजी सरपंच रुपचंद चौधरी, सामाजिक कार्यकर्ता सुदाम गिरेपुंजे, डॉ. युवराज मोटघरे, शाळा समिती अध्यक्ष नरेश बारसे प्रामुख्याने उपस्थित होते.
0 टिप्पण्या