Ticker

6/recent/ticker-posts

कावलगाव येथे वंचितची बैठक संपन्न

रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515

पूर्णा :- वंचित बहुजन आघाडी तालुका शाखा पूर्णाच्यावतीने कावलगाव सर्कल अंतर्गत सातेफळ या गावी बैठक घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष श्यामसुंदर काळे यांच्या अध्यक्षतेखाली गोविंदराव भेने यांची सर्कल अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीस कावलगाव सर्कल मधील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. गाव तेथे शाखा स्थापन करण्यात येईल यासाठी सर्व सर्कल मधील कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे व येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीला सत्तेमध्ये स्थान मिळवून द्यावे. असे आवाहन तालुकाध्यक्ष श्यामसुंदर काळे यांनी बोलते वेळेस केले. 
या बैठकीस चळवळीतील कार्यकर्ते धारबाजी धुमाळे, गौतम ढाले, समता सैनिक दलाचे सुनील मगरे, तसेच सर्कल मधून श्याम विठ्ठलराव गोधने, कोंडीबा हंकारे, नागनाथ सोपानराव गायकवाड, राजकुमार बालाजी कांबळे, पांडुरंग बंबरोळे, शिवदास विठ्ठल भेणे, आकाश गोपाळ गाय गोधने, लक्ष्मण कोंडीबा गायकवाड, सुबोध गणेश गायगोधने,  समता सैनिक दलाची सैनिक अविनाश सखाराम गायगोधने, आनंद गायकवाड, सोनाजी रावण गुरुवार, रफिक बेग मिया पठाण, गणेश संतराम गायकवाड, गणपत रुखामाजी जोगदंड इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार सर्कल अध्यक्ष गोविंदराव गंगाधर भेने यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या