रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
कोल्हापूर : - रुई ता. हातकणंगले येथे दोन गटामध्ये झालेल्या भांडण व बाचाबाचीमधून जबर मारहाण व वसाहतीवर दगडफेकेची घटना घडली. त्यामध्ये चार मुलांना जबर मारहाण झाली आहे. त्यांच्यावर मिरज येथील सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. त्यापैकी कार्तिक राजेंद्र कोठावळे हा गंभीर जखमी असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर हल्ला करणारे व वसाहतीवर दगडफेक करून दहशत माजवणारे गावागुंड अद्याप ही गावातून मोकाट फिरत आहेत. त्यांना ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने जयसिंगपूर विभागाच्या पोलिस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळंके यांना निवेदन देवून तात्काळ कारवाईची मागणी केली.
यावेळी उपस्थित रुई गावाचे ग्रामस्थ व कार्यकर्ते. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, जिल्हा सचिव प्रतापराव तराळ, संतोष कांबळे, सागर कांबळे, राजु कांबळे, विजय जिरगे, मुबारक मुल्ला, सुवास कांबळे, सुधिर कांबळे, रविंद्र तराळ, स्वप्निल तराळ ओमकार कांबळे, चरण कांबळे, किरणं कांबळे तसेच महिला व पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
0 टिप्पण्या