Ticker

6/recent/ticker-posts

जि.प.प्रा.शाळा ७४जळगाव येथे ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा,



 गौतम सोनवणे जिल्हा विशेष प्रतिनिधी,
औरंगाबाद मो.8308128457,


औरंगाबाद :-पैठण तालुक्यातील ७४जळगाव येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७७ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम शाळा व्यवस्थापन सदस्या श्रीमती सीमाताई गणेश बजारे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री भाग्यवंत सर यांनी केले. यानंतर विद्यार्थ्यांनी मराठी, इंग्रजी, हिंदी भाषेमधून भारतीय स्वातंत्रयाचा इतिहास सर्वासमोर मांडला तसेच देशभक्तीपर गीतांचे गायन केले. यावेळी
ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य वाटप करण्यात आले.FLN अंतर्गत माता पालकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व सामूहिक पंचप्रण आणि FLN शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री काटे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री खरात सर  यांनी केले.
याप्रसंगी पैठण बाजार समितीचे उपसभापती राम पा एरंडे, सरपंच गौतम सोनवणे,उपसरपंच नितीन पा एरंडे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू एरंडे,  नारायण सोनवणे, देविदास एरंडे, ग्रामसेवक मापारीसाहेब , तलाठी निकम मॅडम,ग्रा.पं,प्रतिनिधी बाबासाहेब मुळे,अशा सेविका यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सहशिक्षिका शेख मॅडम आणि दहिफळे मॅडम यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या