Ticker

6/recent/ticker-posts

कासारखेडा येथील आंदोलनकर्त्याच्या सर्व मागण्या पंधरा दिवसात निकाली काढणार - मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल

जिल्हाध्यक्ष पालमकर यांच्या प्रयत्नाला यश.

 नांदेड : कासारखेडा नांदेड येथील वंचित बहुजन आघाडीचे सर्व जाती धर्मातील कार्यकर्ते, नागरिक यांनी ग्रामपंचायत कार्यालय कासारखेडा समोर मागण्या मान्य होईपर्यंत बेमुद्यात धरणे आंदोलन साखळी उपोषण सुरू केले होते. आज सहा दिवस पूर्ण झाले. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांची कार्यालयात जाऊन भेट घेतली. त्यांना विनंती करून लगेच कासारखेडा ग्रामपंचायत समोर बसलेल्या आंदोलनकर्त्याला आपण स्वतः भेट घेऊन त्यांच्या मागण्या संदर्भाने त्वरित विचार करावा असे लेखी विनंती निवेदन केले. जिल्हा परिषदेच्या C O करणवाल मॅडम यांनी लगेच आपल्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन कासारखेडा ग्रामपंचायत येथे बसलेल्या आंदोलनकर्त्यांची भेट घेतली,* त्यांच्या समस्या जाणून घेतल्या., त्या स्वतः नवीन कासारखेडा दलित वस्तीत स्वतः भेट देऊन येणाऱ्या पंधरा दिवसात नमुना नंबर आठ व गावातील रस्ते, नाल्या, कायमस्वरूपी पिण्याचे पाणी लाभधारकांना त्वरित घरकुल मंजूर करून देण्याचे लेखी आश्वासन दिले ग्रामपंचायत अंतर्गत होणाऱ्या सर्व कामाची चौकशी करून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले. गावात अवैध धंदे, अवैद्य मुरूम, गुटका, मटका अशा अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून कार्यवाही करण्यासाठी विनंती प्रस्ताव पाठवते, राज्य शासनाच्या कार्यक्षेत्रातील मागण्या संबंधी त्वरित प्रस्ताव पाठवण्यातील असे गावकऱ्यांच्या समक्ष सांगण्यात आले. लेखी आश्वासनात नंतर कासारखेडा येथील आंदोलनकर्त्यांनी आज सहाव्या दिवशी स्वखुशीने आंदोलन माघार घेण्यात आली.

येथील भेट दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच, दिनकर चोपडे, मारुती हिंगोले, पुंडलिक हिंगोले,रवी कंधारे, महिला कार्यकर्त्या तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पदाधिकारी अमर हत्तीआंबिरे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या