चित्रा न्युज प्रतिनिधी
नांदेड : आज 31 ऑगस्ट “विमुक्त दिन” नांदेड महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून साजरा करण्यात आला.
वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमास मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष पालमकर म्हणाले, इंग्रजांना गनिमी काव्याने सळोकी पळो करून सोडणाऱ्या, इंग्रजांचे खजिने लुटणाऱ्या जमातीच्या लोकांना इंग्रजांनी 1871 च्या जन्मजात गुन्हेगारी कायद्यान्वये खुल्या काराग्रहात बंदिस्त करून ठेवले होते. भारतीय स्वातंत्र्याच्या पाच वर्ष 17 दिवसानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर व जयपाल मुंडा यांच्या अथक प्रयत्नानंतर देशाचे पहिले प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी 31 ऑगस्ट 1952 रोजी या जमातींना 'जन्मजात गुन्हेगार कायद्या' तून मुक्त केल्याची घोषणा संसदेत केली. तो दिवस भटक्या विमुक्ताचा विशेष मुक्तीचा दिवस “विमुक्त दिन”.त्यानंतर सोलापूर मध्ये येऊन खुल्या कारागृहाच्या तारा कापत भटक्या विमुक्तांना कारागृहातून मुक्त केले. आजही हा समाज प्रवाह पासून दूर आहे.
देशाच्या स्वातंत्र्याची 75 वर्षे उलटून गेल्यानंतर या जमाती तिचे जीवन जगत आहेत. या या समाजाचा शैक्षणिक, आर्थिक, राजनैतिक विकास होणे गरजेचे आहे. तसेच सर्वागीण विकासासाठी समग्र जातीगत जनगणना होणे आवश्यक आहे.
निवास, शिक्षण, आधार कार्ड मतदान कार्ड यांना आजही मिळाले नाही.म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने 2019 च्या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी, लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत या समाजाला प्रतिनिधित्व दिले, आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सबंध राज्यभर विमुक्त दिन साजरा केला जात आहे.
म्हणून आजच्या दिवशी पासून किमान भटक्या विमुक्त समाजाने आपले पारंपारिक व्यवसाय सोडून मुख्य प्रवाहात यावे आणि स्वाभिमानाने जगावे, स्वालंबी व्हावी. असे आव्हान जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांनी केले.या कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील भटक्या समाजाचे वासुदेव, जोशी, गोसावी, मसनजोगी, शिकलकरी, अशा विविध जाती धर्मातील लोकांनी आज 'विमुक्त दिन' म्हणून साजरा करण्यासाठी एकत्र जमले होते.भटक्या विमुक्त जातीतील अनेक लोक पारंपारिक वेशभूषा परिधान करून महात्मा फुले यांच्या पुतळ्यास जवळ अभिवादन करण्यासाठी आले होते. 31 ऑगस्ट विमुक्त दिन म्हणून साजरा केला पाहिजे, म्हणून मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.या कार्यक्रमास वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष नंदन नांगरे, देविदास हादवे, राजू भांडे, अमर हत्तीआंबिरे सुनील गोदने, श्रावण भालेराव, व भटक्या विमुक्त समाजातील सर्व कार्यकर्ते, अनेक महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या