कुर्डुवाडी प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
कुर्डुवाडी - वंचित बहुजन आघाडी कुर्डुवाडी या घटनेचा निषेध व्यक्त करून प्रांताधिकारी यांना कुर्डुवाडी शहरअध्यक्ष प्रदीप सोंनटक्के यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील उच्चवर्णीय समाजातील काही लोकांनी एकत्र येत माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली असून, या गावातील बौद्ध तरूणांना झाडाला उलटे टांगून बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर स्वतः थुंकले लघवी केली आणि ती त्या बौद्ध तरुणांना चाटायला लावली. पुरोगामी महाराष्ट्रात अश्या घटना वारंवार घडत असुन राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे कायद्यांचा धाक उरलेला नाही. त्यामुळे नाना गलांडे , युवराज गलांडे यांच्यासारखे लोक कायदा हातात घेऊन बौद्ध समाजावर अत्याचार करत आहे, अशा या घटनेवरून या लोकांना राजकीय आश्रय असल्याचे दिसून येते. त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी निःपक्षपणे चौकशी करावी व सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी, अट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून सदरील घटना फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पिडीत कुटुंबाला न्याय मिळवुन द्यावा. नसता वंचित बहुजन आघाडीच्यावतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करेल याची सर्व ती जबाबदारी राहील असेही निवेदनात म्हटले आहे.
कुर्डुवाडी शहरअध्यक्ष प्रदीप सोनटक्के उपस्थित. एम बी कांबळे ,महादेव साबळे ,बाबासाहेब ओहोळ ,मोहन लोंढे ,सुढेशना बडेकर,गणेश पवार, दत्तात्रय जाधव , इसाक काझी, बुद्धभूषण वाघमारे,ओंकार पवार ,सूरज अस्वारे ,अरबाज शेख,किशोर साळवे ,इत्यादी उपस्थित होते


0 टिप्पण्या