Ticker

6/recent/ticker-posts

अहमदनगर ते बीड राष्ट्रीय महामार्ग खोदकामामुळे धुळीचे साम्राज्य....

नागरिकांचे आरोग्य धोक्यात ? 

गोरख मोरे जिल्हा प़तिनिधी बीड 

 बीड   :-अहमदनगर ते बीड या राष्ट्रीय महामार्ग कडा शहरातून जात असल्याने   बाजारपेठ मोठी असून याठिकाणी ३० ते ४० गावचे लोकं आपले दैनंदिन व्यवहारासाठी येत असतात त्या या रस्त्याचे काम साबलखेड ते आष्टी १७ किलोमीटर अतिशय संथ गतीने चालू असून ठिकठिकाणी पुलाचे काम सुरू आहे परंतु अश्या धोकादायक ठिकाणी कोणत्याही प्रकारची खबरदारी चा उपाय केलेला दिसून येत नाही त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या रोडवरून लहान मोठ्या वाहनांची संख्या जास्त प्रमाणात असून या महामार्गालगत साबलखेड,कडा, शेरी बु,खाकळवाडी,वटणवाडी, जळगाव, कडा कारखाना, कासारी व आष्टी या राष्ट्रीय महामार्गावर मोठं मोठी जड वाहने व आलिशान गाड्या भरधाव वेगाने जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले असून या धुळीमुळे डोळ्याबरोबर नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महामार्गाचे काम चालू असल्याने त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालकासह मोटरसायकल वर प्रवास करणारे प्रवासीवर्ग पूर्णपणे त्रस्त झाला असून याकडे बांधकाम विभाग पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे  रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविले जात असून या रोडवर मातीमिश्रित मुरूम टाकल्याने पाऊस पडताच या महामार्गावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते.  या मार्गावरून चालतांना पादचारी ही पूर्णपणे त्रस्त झाले आहेत गेल्या २० ते ३० दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे महामार्ग पूर्णपणे सुकले असून याचे रुपांतर धुळीत झाले आहे. ही सर्व धूळ प्रवाशांच्या व महामार्गावरील परिसरात असणार्‍या गावातील नागरिकांच्या नाकातोंडासह अंगावर उडत आहे.यामुळे येथील नागरिकांच्या व प्रवाश्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही धूळ नागरिकांच्या नाका तोंडात जाऊन सर्दी, खोकला, व श्वसनाच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. महामार्गावरील चौपदरी करणाचे काम बांधकाम विभागाच्या आशिर्वादाने गेली आठ ते महिने अतिशय मंद गतीने सुरु असुन हे काम केव्हा पूर्ण होईल? याची खात्री देता येत नाही; परंतु पाऊस पडला तर या मार्गावर चिखल व खड्डे यामुळे स्लिप होत असल्याने प्रवासी वर्ग त्रस्त होतात. यामुळे कंबरदुखीसारखे आजार होतात तर पाऊस बंद झाल्यावर धुळीमुळे रोड लगत राहणाऱ्या लोकांना व प्रवाशांना खोकला, सर्दी यासारखे आजार होतांना दिसत आहेत. टु-व्हीलरवरुन प्रवास करणार्‍यांना तर सर्वात जास्त त्रास सहन करावा लागत असून उडणारी धूळ प्रवाशांच्या डोळ्यात गेल्यामुळे अपघातही होतांना दिसत आहे. त्यामुळे या महामार्गावर ताबडतोब उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिक व रोडच्या परिसरातील ग्रामस्थ करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या