Ticker

6/recent/ticker-posts

तिरोडा राष्ट्रवादी काँग्रेस ची बैठक


प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558

गोंदिया-महाराष्ट्रात राजकारण वेगळ्या वळणावर जात असताना राष्ट्रवादी मध्ये अजित पवार यांच्या बंड खोरी नंतर निर्माण झालेल्या परिस्तिथी च्या पार्शभूमीवर गोंदिया जिल्हा चे नेते खा. प्रफुल पटेल यांच्या गृह जिल्ह्यात मा. शरद पवार अध्यक्ष, व मा. सुप्रियाताई सुळे यांच्या आदेशावरून गोंदिया जिल्ह्यात पक्षाची मजबुती करण्याच्या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा इथे दीनानाथजी पडोळे माजी आमदार व प्रदेश जनरल सेक्रटरी महाराष्ट्र, बजरंगसिहंजी परिहार प्रदेश उपाध्यक्ष व निरीक्षक गोंदिया जिल्हा, दिलीपजी पनकुले प्रदेश सेक्रटरी यांच्या उपस्तिथीत सिंधी भवन तिरोडा इथे  राष्ट्रवादी पक्षाची सभा घेण्यात आली त्यामध्ये तिरोडा तालुक्यातील पक्ष निस्टावान कार्यकर्त्यांनी हजेरी लावली, त्याच प्रमाणे  माजी नगर सेवक नरेश धुर्वे आणि राजश्री उपवंशी, सोमेंद्र (मुन्ना )उपवंशी, यांनी प्रवेश केला, तालुक्यातील आदिवासी बांधवानी सुद्धा प्रवेश केला त्या मध्ये प्रामुख्याने संजयजी धुर्वे, टेकाम मैडम आणि त्यांच्या सोबत असलेले कार्यकर्ते यांनी सुद्धा पक्ष प्रवेश केला .आलेल्या पाहुण्यांचे शाल आणि गुलदस्ता देऊन स्वागत करण्यात आले, मिळालेल्या माहितीनुसार मा. शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ असलेल्या आणि प्रफुल पटेल यांच्या राष्ट्रवादी पक्षात असलेले तालुक्यातील कार्यकर्ते सुद्धा प्रवेश करण्याच्या मार्गांवर आहेत.
असे झाल्यास तिरोडा तालुक्यात राष्ट्रवादी अजित पवार गट ला मोठ्या प्रमाणात खिंडर पडण्याची शक्यता  वर्तवली जातं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या