Ticker

6/recent/ticker-posts

मचारणा येथे सांस्कृतिक सभामंडप व सिमेन्ट रोड बांधकामाचे भूमिपूजन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324


भंडारा :-लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायत मचारणा येथे दिनांक दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी पंचायत समिती सदस्य कनेरी क्षेत्र अश्विनीताई रुपवसंत मोहतुरे यांच्या शुभहस्ते तसेच मचारणा गावचे प्रथम नागरिक सरपंच अचलाताई फटे यांच्या प्रमुख उपस्थितीत पायाभूत मूलभूत सुविधा 25-15 निधीतून 10 लक्ष अंदाजपत्रक किंमतीचे  सांस्कृतिक सभामंडपाचे  तसेच साकोली विधानसभा क्षेत्राचे आ.नाना पटोले यांच्या विकास कामाकरीता स्वनिधितून 10 लक्ष रुपये किंमतीच्या सिमेन्ट रोडचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. मचारणा येथे सांस्कृतिक भवन बांधकाच्या जागेची विधिवत  पुजा अर्चा करून भुमीपुजन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गावात सांस्कृतिक सभामंडप झाल्यास विविध विषयांवरील कार्यशाळा, चर्चा, भाषण, चर्चासत्रे, तसेच सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांसाठी सांस्कृतिक भवन गावातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. तसेच मान्यवरांच्या हस्ते सिमेंट रोडचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी भूमीपूजनाप्रसंगी ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ता मोहनजीं झलके  व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या