कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- लाखनी तालुक्यात बहुतांश शेतजमीन कोरडवाहू असल्याने ९० ते ११० दिवसांत परिपक्व होणाऱ्या हलक्या प्रजातीच्या धानाची लागवड केली जाते. हे धान परिपक्व झाले असून कापणीसाठी आलेले आहेत. त्यामुळे खरीप हंगाम २०२३ मध्ये विजयादशमीपूर्वी शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्र सुरू करावे. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.
खरीप हंगाम २०२३ मध्ये सुरुवातीपासूनच धान पिकास आवश्यक ती पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे पेरणीसह रोवनीही मुदतीत आटोपण्यात आली. तसेच सप्टेंबर च्या शेवटपर्यंत पाऊस आल्याने हलक्या प्रजातीचे धान परिपक्व झालेले आहेत. त्यामुळे हलक्या प्रजातीची लागवड करणारा धान उत्पादक शेतकरी वातावरणानुरुप धानाच्या कापणी व मळणीचे प्रतिक्षेत आहे. असे माजी जिल्हा परिषद आकाश कोरे यांचे म्हणणे आहे. धान उत्पादक धान पिकासाठी वित्तीय संस्थांकडून पीक कर्ज घेत असतो. त्याच्या परतफेडीकरिता मळणी होताच धानाची विक्री करतो. पण व्यापारी हमीभावानुसार धान खरेदी करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांची लूट होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय आधारभूत धान्य खरेदी केंद्राचा आश्रय घ्यावा लागतो. पण शासन शासकीय धान खरेदी केंद्राला मुदतीत सुरुवात करीत नाही आणि केली तरीही काही अडचणींमुळे प्रत्यक्षात धान खरेदी केली जात नाही. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या सोयीचा विचार करून शासनाने खरीप हंगाम २०२३ मध्ये विजयादशमीपूर्वी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करावे. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.


0 टिप्पण्या