Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ताक्षराचे छगन राजेंद्र बावनकुळे यांना प्रमाणपत्र भेट

"परीक्षा पे चर्चा २०२३" स्पर्धेते छगन बावनकुळे यांची भरारी 

राजेंद्र बावनकुळे तालुका प्रतिनिधी कामठी जिल्हा नागपूर98235 67919

    
नागपूर :- परीक्षा पे चर्चा २०२३ स्पर्धेत केंद्रीय विद्यालय, कामठी येथील इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थी छगन राजेंद्र बावनकुळे यांने "परीक्षा पे चर्चा" कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली असून ही परीक्षा ७ जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आली होती.  
    परीक्षा पे चर्चासत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना भारताच्या विकासाचे ध्येय - विकसित भारत, गुलामगिरीच्या मानसिकतेचे समूळ उच्चाटन करणे, आपल्या वारशाचा गौरव करणे, एकात्मता बळकट करणे,
कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करणे विषयावर संधी देण्यात आली होती. या केंद्रीय विद्यालयाचे विद्यार्थी छगन राजेंद्र बावनकुळे यांनी उचित प्रश्नाचे उत्तर दिल्याने पंतप्रधान कार्यालय दिल्ली येथून भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून केंद्रीय विद्यालय कामठी येथे प्रमाणपत्र किट पाठवून छगन बावनकुळे याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्राद्वारे गौरविण्यात आले. या प्रमाणपत्रात छगन बावनकुळे याला मार्गदर्शन केले.
   यावेळी  पारितोषिक व प्रमाणपत्र कामठी केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक जितेंद्र रामटेके सर आणि राहुल धनविज  सर यांच्या हस्ते देण्यात आले. रामटेके सर  आणि केंद्रीय विद्यालयातील शिक्षकांनी छगन बावनकुळे यांचे शाळेच्या वतीने कौतुक केले. या प्रसंगी आई अरुणा बावनकुळे व वडील शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे यांचे नातेवाईक आणि संबंधित मित्रपरिवारा कडून अभिनंदन स्वीकारण्यात व्यस्त आहे. मिठाई वाटून ते आपल्या मुलांच्या यशाच्या आनंद साजरा करत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपक्रमात‌ यश आल्याने सर्वत्र कौतुकाच्या वर्षाव होत आहे


प्रिय छगन बावनकुळे,
 
 माझे प्रेमळ आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. 'परीक्षा पे चर्चा' मध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि त्यावर तुमचे विचार मांडल्याबद्दल धन्यवाद. तुमच्यासारख्या तरुण नागरिकांचे विचार जाणून आणि समजून घेणे नेहमीच प्रोत्साहन देणारे असते.
भारताची युवाशक्ती आपल्या वैयक्तिक ध्येयांची राष्ट्रीय प्रगतीशी सांगड घालून देशाला प्रगतीच्या उच्च शिखरावर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, याचा मला विश्वास आहे.आयुष्याच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही यशस्वी व्हाल अशा विश्वासासह मी तुम्हाला उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.

आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या