एक आरोपी अटक, दोन फरार, १७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
राजेंद्र बावनकुळे तालुका प्रतिनिधी कामठी जिल्हा नागपूर98235 67919
नागपूर : - पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा टोल नाका जवळ पोलीसांनी नाकाबंदी करुन आयसर वाहन ला पकडुन २९ गोवंश जनावरांना जीवदान देऊन एका आरोपी ला अटक करित एकुण १७ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन पोस्टे ला तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून दोन आरोपींचा शोध सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार मंगळवार (दि.०३) ऑक्टों बर ला रात्री ९ वाजता ते बुधवार दि.(०४) ऑक्टोंबर ला सकाळी १० वाजता पर्यंत नाईट ड्युटी अधिकारी पोहवा. जयलाल सहारे यांचे मदतनीस पोशि कोमल खैरे ड्युटीवर हजर असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहिती मिळाली की, मनसर येथुन जबलपुर नागपुर राष्ट्रिय महामार्गाने आयसर वाहन क्र. एमएच- ४०-सीएम - ७६१३ ने अवैधरित्या जनावरे कत्तली करीता निर्दयतेने वाहना मध्ये भरुन वाहतुक करित आहे. अश्या विश्वसनीय माहिती वरून सपोनि राजेश जोशी , नाईट ड्युटी अधिकारी पोहवा. जयलाल सहारे, पोशि. वैभव बोरपल्ले, पोशि. नविन पाटील, पोना. जितेन्द्र गावंडे सह पोलीस कर्मचारी सरकारी वाहनाने रवाना होऊन बोरडा टोल नाका कन्हान जवळ नाका बंदी केली असता एक आयसर वाहन क्र. एम एच - ४०- सीएम - ७६१३ येतांना दिसुन आल्याने पोलीसां नी वाहनास थांबण्याचा ईशारा केला असता वाहन चालकाने काही अंतरावर जाऊन वाहन थांबविले. कन्हान पोलीसांनी वाहनाचा पाठलाग केला असता एक इसम पोलीसांना पाहुन पळुन गेला व वाहन चाल कास पोलीसांनी स्टाप च्या मदतीने पकडुन वाहनाची पाहणी केली तर वाहना मध्ये लाल, काळ्या, पांढऱ्या रंगाचे एकुण २९ गोवंश दोराने पाय व तोंड निर्दयतेने बांधलेले मिळुन आल्याने पोलीसांनी ४ बैल प्रत्येकी किंमत १२,००० रु प्रमाणे ४८,००० रु, ४ गाय जातीचे गोवंश प्रत्येकी किंमत १०,००० रु प्रमाणे ४०,००० रु, २१ गोरे प्रत्येकी किंमत ६००० रु प्रमाणे १,२६,००० रु , आयसर वाहन किंमत १५,००००० रु असा एकुण १७,१४,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी साहील उमनलाल कुंभलकर वय १७ वर्ष रा. बाबा ताज मेडिकल आझाद नगर नई बस्ती नागपुर याला ताब्यात घेण्यात आले. पोलीसांनी २९ गोवंशाची देख रेख चारापाण्याची व्यवस्था करण्याकरिता गो विज्ञान अनुसंधान केंद्र लाखनी जिल्हा भंडारा येथे दाखल करण्यात आले व पोचपावती प्राप्त करण्यात आली. २ जनावरे उपचारा दरम्यान मरण पावले असुन त्या बाबत मा. पशु वैद्यकीय अधिकारी लाखनी यांना शव विच्छेदना करुन सविस्तर अहवाल देण्याकरिता पत्र देण्यात आले. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी सरका र तर्फे फिर्यादी पोशि कोमल खैरे यांचा तक्रारी वरून आरोपी १) साहील कुंभलकर, २) सहबाज रा. शिवनी ३) खान साहाब रा.जाफर नगर नागपुर यांचा विरुद्ध अप क्र. ६४३/२३ कलम ११(१)(ए),११(१)(डी),११ (१)(ई), ११(१)(एफ), ११(१)(आई) प्रा.छ.प्र.अधि. १९६० सहकलम ५ (अ), ५(ब) म.प्रा.सं.अधि.१९९५ सहकलम ११९ म.पो.का. सहकलम ४२९ , १०९ , ३४ भादंवि. अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार जयलाल सहारे, पोशि कोमल खैरे हे करित असुन दोन आरोपीचा शोध घेत आहे.
0 टिप्पण्या