🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - ८ ऑक्टोबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०७९
भा. रा. १६ आश्विन १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : वर्षा
मास : भाद्रपद
पक्ष : कृष्ण
तिथी : नवमी (१०.१०) ~ दशमी
वार : रविवार
नक्षत्र : पुष्य (२६.४५) ~ आश्लेषा
राशी : कर्क
*दशमी श्राद्ध*
*नारायण दशमी*
*रविपुष्य योग*
*भारतीय वायु सेना दिवस*
१९३२:’इंडियन एअर फोर्स अॅक्ट’ द्वारे भारतीय वायुदलाची स्थापना झाली.
१९५९:स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.
१९७८: ऑस्ट्रेलियाच्या केन वॉर्बीने पाण्यावर ३१७.६० ताशी मैल वेगाचा मोटर बोटीचा विक्रम केला.
१९८२: पोलंडने सॉलिडॅरिटी व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.
२००१: सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची स्थापना केली.
२००५: काश्मीर मध्ये झालेल्या ७.६ रिश्टर भूकंपा मुळे सुमारे ८६,००० – ८७,५०० लोक मृत्युमुखी पडले. ६९,०००- ७२,५०० जण जखमी झाले
आणि २८ लक्ष लोक बेघर झाले.
जन्मदिवस :
१८९१:शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच, किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
१९२६:कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता
१९३५:मिल्खा सिंग – ’द फ्लाइंग सिख’
१९६०: नेटफ्लिक्स चे सहसंस्थापक रीड हेस्टिंग्ज
मृत्यूदिन :
२०१२:वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका
१९९८:इंदिराबाई हळबे ऊर्फ ’मावशी' – देवरुख येथील ’मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका.
१९९६:गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तळासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक.
१९७९:’लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान
१९६७:क्लेमंट अॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान
१९३६:धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद‘ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
१८८८: महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ’राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले.
*।। दास-वाणी ।।*
वेदशास्त्रपुराणअर्थ ।
गुप्त चालिला परमार्थ ।
सर्वज्ञपणे समर्थ ।
गुण आत्मयाचे ।।
बद्ध मुमुक्ष साधक सिद्ध ।
विचार पाहाणे शुद्ध ।
बोध आणि प्रबोध ।
गुण आत्मयाचे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : २०/०६/१५-१६
चौऱ्यांशी लक्ष योनीमधे जाणती कळा त्या त्या जीवाच्या गरजेइतकी असतेच. परंतु मानवी देहामधे हे आत्मचैतन्य सर्वाधिक विकसित स्वरूपामधे असते.
, म्हणूनच वेद शास्त्रे पुराणांचा अर्थ लावणे, अंतरंगामधे चाललेला परमार्थ विचार, सर्वज्ञतेचे सामर्थ्य या सर्व मानवी अंतरात्म्याच्याच अभिव्यक्ती आहेत.
तसेच मानवी देहामधेच बद्ध म्हणजे बांधलेला प्रापंचिक, मुमुक्ष म्हणजे पश्चात्ताप पावलेला बद्ध, साधक म्हणजे साधनामार्गावर असलेला मुमुक्ष आणि सिद्ध म्हणजे परमोच्च पातळीवर पोहोचलेला साधक अशा चार प्रकारच्या अभिव्यक्तीचे लोक आढळतात. शुद्ध विचारांची ओळख, बोध आणि प्रबोधस्थिती याही अभिव्यक्ती फक्त अत्यंत दुर्लभ अशा मनुष्यदेहामधेच आढळतात.
आत्मागुणनिरूपण समास.
🙏 💐💐💐💐 💐 🙏
0 टिप्पण्या