प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण.
मो.9834486558
गोंदिया -महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मा. जयंत पाटील यांच्या आदेशावरून गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील राघवेंद्र चंदनसींग बैस (बाबा बैस )यांची गोंदिया जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय नेते व पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचे विचार सर्व दूर पोहचविण्याचे तसेच पक्ष मजबूत करण्याचे ध्येय लक्षात ठेऊन तसेच पक्षाचे धोरण सर्वसामान्य जनते पर्यंत पोहचविण्याचे काम करण्यासाठी व भविष्याच्या पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी सुधीर वासनिक मार्गदर्शक ,इक्बाल शेख जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्यांक गोंदिया जिल्हा,मुन्ना उपवंशी,नरेशजी धुर्वे, संजयजी धुर्वे, राजा पटेल,आणि कार्यकर्ते उपस्तित होते.
0 टिप्पण्या