रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
भंडारा :- गोपिकाबाई भुरे महिला महाविद्यालय, तुमसर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थिनी करिता सिकलसेल व एच आय व्ही तपासणी शिबिर तसेच क्षयरोग व आरोग्य मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजण्यात आले. सदर शिबिर सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालय, तुमसर यांच्या सहकार्याने यशस्वी झाले. सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालय ,तुमसर च्या पथकात डॉक्टर शालिनी चौधरी, मेडिकल ऑफिसर ; श्री हेमंत देशमुख ,कौन्सेलर ; मीनाक्षी शेंडे ,आय सी टी सी लॅब टेक्निशियन ;पौर्णिमा नंदागवळी, टीबी लॅब टेक्निशियन;रीना वैद्य, सिकल सेल लॅब टेक्निशियन; शुभांगी सिंगनजुडे, परिचारिका यांचा समावेश होता. सर्वप्रथम सिकलसेल ,एच आय व्ही व क्षय रोगावर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयीन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. मुबारक कुरैशी यांनी केले. त्यानंतर " मुलींनी आरोग्याची निगा कशी ठेवायला पाहिजे, तसेच सिकलसेल ऍनिमिया चे प्रकार व त्यावर उपाययोजना आणि औषधोपचार " यावर डॉक्टर शालिनी चौधरी यांनी सखोलपणे चर्चा केली. मुलींच्या मासिक पाळीच्या समस्येवर ही हितगुज झाली. श्री हेमंत देशमुख यांनी "एच आय व्ही , एड्स ची कारणे विशद करून त्याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजना कोणती आणि या रोगामुळे रोगप्रतिरोधक शक्ती कशी कमी होऊन वेगवेगळे रोग होऊ शकतात, त्यात क्षयरोगाचाही समावेश असू शकते" असे प्रतिपादित केले. तर पौर्णिमा नंदा गवळी यांनी " क्षय रोगाची लक्षणे कोणती व संदेह झाल्यास त्वरित औषधोपचार करण्यात यावे " यावर बळ दिला तसेच आशा वर्करच्या माध्यमातून सुद्धा उपचार सुरू करता येते असे आपल्या मार्गदर्शनातून सल्ला दिला .अध्यक्षीय भाषणाद्वारे महाविद्यालयीन प्राचार्य डॉ. युवराज सेलोकर यांनी विद्यार्थिनींना सिकलसेल व एच आय व्ही ची चाचणी करण्याकरिता सहकार्य करण्याचे आव्हान केले .कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. मुबारक कुरेशी यांनी केले ,तर आभार प्रा. डॉ. कल्पना शिंदे यांनी मानले .मार्गदर्शनानंतर महाविद्यालयीन विद्यार्थिनींची सिकलसेल व एचआयव्ही चाचणी करण्यात आली. यात 98 विद्यार्थिनींचे रक्ताचे सॅम्पल घेण्यात येऊन शासकीय लॅबला पाठविण्यात आले. या संपूर्ण शिबिराच्या व कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महाविद्यालयीन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. मुबारक कुरेशी , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर युवराज सेलोकर आणि श्री सुदामा एज्युकेशन सोसायटी चे उपाध्यक्ष श्री विनोद तीतीरमारे तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवीका कु. सेजल टेंभरे , कु. पायल पवनकर, कु. प्रिया भोयर ,कु.स्वाती नगरधने, कु. जानवी सारवे, कु.पल्लवी बांते, कु.अर्चना पारधी, इत्यादींनी अथक परिश्रम घेतले. प्रा.डॉ. नीता सोमनाथे, डॉ.अरुणा देवगडे, डॉ. उमेश चव्हाण, प्रा. गायत्री सिरसाम ,प्रा. अशोक चोपकर तसेच शिक्षकेतर कर्मचारी कुमुद पारधी ,सुधाकर सारवे, श्रीकृष्ण तीतिरमारे, देवेंद्र मंडपे ,मालू पेशने , यांनी सुद्धा मोलाचे सहकार्य दिले. सदर शिबिराला महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी प्रचंड प्रतिसाद दिला.
0 टिप्पण्या