Ticker

6/recent/ticker-posts

सैनिक समाज पार्टीची आज १५ आक्टोबरला बैठक.


🔹आगामी निवडणुका आणि उमेदवार ठरणार. 

🔹विविध विषयांवर होणार महत्वपूर्ण चर्चा. 

 चित्रा न्युज प्रतिनिधी

गडचिरोली :-सैनिक समाज पार्टीची बैठक दिनांक १५ आक्टोबर 2023 रोज रविवारला   रेस्ट हाऊस, इंदिरा गांधीं चौक गडचिरोली येथे सकाळी ११  वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.  या बैठकीत महाराष्ट्र राज्यातील   तसेच गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या संभाव्य निवडणूक आणि उमेदवार  यांची माहिती  त्याचप्रमाणे गडचिरोली -  चिमुर   लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ, संभाव्य उमेदवार,  स्थानिक नगरपरिषदेच्या निवडणूका आणि संभाव्य उमेदवार , या बरोबरच जिल्यातील सर्व सामान्य  नागरिकांच्या  समस्या, जिल्ह्यातील  अनेक समस्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. 
     तरी सैनिक समाज पार्टीचे सदस्य आणि पदाधिकारी यांनी आपल्या सोबत अन्य 10  सदस्यांना सोबत  घेऊन यावे. असे आवाहन सैनिक समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष चक्रधर मेश्राम, गडचिरोली जिल्हा विधानसभा प्रमुख हंसराज उराडे, महासचिव प्रकाशसिंग बंडवाल , पुरुषोत्तम सलाम  , अश्विन रोहनकर, गडचिरोली यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या