प्रवीण शेंडे उपसंपादक चित्रा न्यूज महा.
मो.9834486558.
गोंदिया :- दिनांक 19/10/2023 रोजी पोलीस उप निरिक्षक चिरंजीव दलालवाड व सोबत चालक पोशि/950 अख्तर शेख व पोशि/1322 विदेश अंबुले असे मा. पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे सर, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक बनकर सर, मा. श्री. प्रमोद मडामे सर आणि पोलीस निरीक्षक श्री देवीदास कठाळे यांचे मार्गदर्शनाखाली तिरोडा उपविभागात रात्रगस्त करीत असताना गस्ती दरम्यान अदानी पॉवर प्लांट समोर अंधारात एका झाडाखाली दोन इसम बसून काहीतरी करत असल्याचे त्यांना दिसले. त्यांना त्या इसमांवर संशय आल्याने त्यांनी तात्काळ त्यांचे वाहन थांबवून सदर ठिकाणी धाव घेऊन दोन्ही इसमांना ताब्यात घेतले. त्यांना त्या ठिकाणी असण्याच्या कारणाबाबत विचारपूस केले असता त्यांनी कोणतेही समाधानकारक उत्तर दिले नाही. म्हणून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यामध्ये सिगारेट पाकीटचे पुडे, गुटखा व चिल्लर पैसे तसेच घरफोडीचे साहित्य त्यामध्ये अंदाजे दहा ते बारा इंच लांबी असलेला एक लोखंडी कटर व अनेक लहान-मोठे पान्हे असे दिसल्याने पोलिसांचा अधिक संशय बळवल्याने त्यांना याबाबतीत अधिक कसून चौकशी केली असता त्यांनी थोड्या वेळापूर्वी एका पान ठेल्याच्या पाठीमागील बाजूने कटरने पत्रा कापून सदर पानठेल्यामधून रोख पैसे व मुदेमाल चोरी केल्याचे सांगितल्याने पोलिसांनी तात्काळ संशयित दोन्ही इसमांना घेऊन पानठेल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, अदानी पॉवर प्लांट समोर असलेल्या एका पान ठेल्याचे मागील बाजूचे टिन कटरने कट करून चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे चोरी केलेले रोख ₹. 400/-, ₹.1500/- चा चोरीचा माल , अंदाजे ₹. 300/- चा कटर आणि चोरी करतांना वापरलेली मोटारसायकल ₹. 10,000/- असा एकूण ₹. 12,200/- चा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आजरोजी माननीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सतर्कतेने डिव्हिजन पेट्रोलिंग करत असताना वरील दोन इसम संशयित रित्या मिळून आल्याने आणि त्यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पो.स्टे. तिरोडा येथे त्यांच्यावर घरफोडीचा गुन्हा नोंद केला असून पोलीस निरीक्षक श्री देवीदास कठाळे यांचे मार्गदर्शनाखाली पुढील अधिक तपास पोलीस हवालदार कुळमते करीत आहेत.
0 टिप्पण्या