कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा :- लाखनी येथील वनपरिक्षेत्र कार्यालय तथा ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब चे संयुक्त विद्यमाने शनिवारी(ता.७) बस स्थानक लाखनी ते वन आगार गडेगाव पर्यंत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले, पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे, ग्रीन फ्रेंड्स चे अशोक गायधनी, नगर सेवक संदीप भांडारकर, क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले, प्रवीण ढोले, दिघोरे, उईके यांचे प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सायकल रॅलीस सुरुवात करण्यात आली. सायकल रॅलीने शहर वासियांचे लक्ष वेधले होते.
वन्यप्राण्यांप्रती जनतेत जनजागरण व्हावे. नैसर्गिक संसाधनांची सफाई व दुरुस्ती होऊन वनक्षेत्रात वन्य प्राण्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्या. या करिता दरवर्षी १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. वन परिक्षेत्र अधिकारी सूरज गोखले यांचे मार्गदर्शनात सहवनक्षेत्र लाखनी, जांभळी/सडक व उमरझरी येथे पाणवठे सफाई, पाणवठ्यालगत फळझाडे लागवड करण्यात आली. तथा जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वन्यजीव सप्ताहाचे शेवटचे दिवशी शनिवारी वनक्षेत्र लाखनी व ग्रीन फ्रेंड्स नेचर क्लब चे संयुक्त विद्यमाने बस स्थानक लाखनी ते लाकूड आगार गडेगाव पर्यंत सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वन व पोलिस अधिकाऱ्यांसह ग्रीन फ्रेंड नेचर क्लब चे पदाधिकारी, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व समर्थ विद्यालयाचे विद्यार्थी यांचेसह वनरक्षक कुमारी टी.जी. गायधने, कुमारी एम.एल. शहारे, कुमारी ए. ए. रंगारी, डी.एस. बोरकर. राधेश्याम भराडे, नितीन उशीर, कुमारी के.एस. वंजारी, राकेश कोदाने, कावळे, बडोले, तुपट, बागडे, मयूर वंजारी यांचेसह गणमान्य नागरिक उपस्थित असल्याचे क्षेत्र सहाय्यक जितेंद्र बघेले यांनी कळविले आहे.
0 टिप्पण्या