Ticker

6/recent/ticker-posts

"त्या" शेतकरी कुटुंबास अपघात विम्याचा लाभ द्यावा



• माजी जि.प. सदस्य आकाश कोरे यांची मागणी

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324

भंडारा :- लाखनी तालुक्यातील केसलवाडा/वाघ चे वयोवृद्ध शेतकरी दूधराम डोमा लुटे आपले शेतातील धानाची पाहणी करण्यासाठी गेले असता शेतात सापाने पायाला चावा घेतल्याने उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबास स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ देण्यात यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे. 
             मृतक दुधराम लुटे यांचेकडे अंदाजे २ हेक्टर शेतजमीन असून ते मुलासोबत वास्तव्यास आहेत. ते शुक्रवारी ३:०० वाजता दरम्यान गराडा शेतशिवारातील धानाची पाहणी करण्यासाठी जातो असे सांगून घरून निघून गेले दुपारी ४:०० वाजता दरम्यान शेतातील धानाची पाहणी करण्यासाठी धुर्‍यावर उभे असताना त्यांचे पायाला काहीतरी चावल्यासारखा भास झाल्याने त्यांनी खाली पाहिले असता जवळून साप जातांना दिसल्याने सापाने दंश केला असावा. म्हणून शेतालगतच्यांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र केसलवाडा/वाघ येथे भर्ती केले. असे माजी जि.प. सदस्य आकाश कोरे यांचे म्हणणे आहे. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावत असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्याचे निदर्शनास येताच त्यांना पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले. कर्तव्यावरिल वैद्यकिय अधिकाऱ्याने त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. त्या मृत शेतकऱ्याचे कुटुंबीयांनी सर्व अटींची पूर्तता केल्याने त्या वयोवृद्ध शेतकऱ्याचे कुटुंबास शासनाने स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ द्यावा. अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य आकाश(हेमंत) कोरे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या