• जिल्हाध्यक्ष शरद इटवले यांची माहिती
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो.9545914324
भंडारा- ग्रामपंचायतीचे कामकाज करतांना येणाऱ्या अडचणीची देवाणघेवाण तथा भेडसावणाऱ्या समस्यांचे सोडवणुकीकरिता भंडारा जिल्हा सरपंच संघटनेच्या वतीने ९ ऑक्टोबर २०२३ रोज सोमवार ला दुपारी २:०० वाजता जिल्हा परिषद सभागृह भंडारा येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, सरपंच महोत्सव कार्यक्रम घेण्याबाबद विचार विनिमय करणे, ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या शासकीय कामाबाबद मार्गदर्शनपर चर्चा करणे तथा अध्यक्षाची परवानगीने वेळेवर येणारे इतर विषय या विषयावर चर्चा होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त संख्येने सरपंच महोदयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद इटवले, उपाध्यक्ष पुरुषोत्तम रुखमोडे, दीपाली कुरंजेकर, सचिव प्रमोद प्रधान, सहसचिव सुधीर मिसाळ, कोषाध्यक्ष गुलाब सव्वालाखे, संपर्क प्रमुख नंदकिशोर कावळे, प्रसिद्धी प्रमुख खुमेश बोपचे, पारसकुमार भुसारी, माधवी बडवाइक, प्रवक्ता मनोहर बोरकर, डॉ. हर्षवर्धन कोहपरे यांनी केले आहे. तथा सरपंच संघेटनेचे पदाधिकाऱ्यांनी सकाळी ११:०० वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या