मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो,9860179256
उस्मानाबाद :- ( धाराशिव ) पुरोगामी महाराष्ट्रातील फुले,शाहू, आण्णाभाऊ,आंबेडकरी विचारधारेच्या पत्रकार आणि पत्रकारितेला राज्य स्तरावर सोशल मीडिया/प्रिंट मिडिया/इलेक्ट्रॉनिक मिडिया/वेब पोर्टल निर्माण करण्याची गरज असल्याने आज दिनांक 15 ऑक्टोबर 2023 रोजी,सकाळी 11 ते सायंकाळी 04.00 वाजे पर्यंत उस्मानाबाद शहरातील शासकीय विश्रामगृह येथे मा.डि.एस सावंत साहेब (मुबंई ) यांच्या प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.या वेळी सावंत सरांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेला मिडिया लोकशाहीच्या रक्षणार्थ काम करत नसल्याने लोकशाहीचे निर्माथे फुले, शाहू,आण्णाभाऊ,आंबेडकर यांच्या विचाराचा मिडिया आणि पत्रकार संघ उभा करणे अत्यंत गरजेचे असल्याने त्याकामी उस्मानाबादेत ही बैठक घेण्यात येत असल्याचे सांगितले. त्याच बरोबर ते म्हणाले की,सध्या सर्व प्रकारची मिडिया एका ठराविक विचारसरणीसाठी व्यवसायिक पद्धतीने काम करत आहे.त्यामुळे लोकशाही आणि लोकशाहीचे निर्माता असलेले भारतीय संविधान धोक्यात आले आहे.परिणामी मिडियाच्या चुकीच्या भूमिकामूळ राज्यच नव्हे तर देश्यातील संपूर्ण बहुजन समाजाच्या मूलभूत अधिकारांची पायामल्ली होतं आहे.त्यामुळं आम्ही राज्यातील सर्व जिल्ह्यात पत्रकार,संपादक,
साहित्यिक,कवी,व्याख्याते,लेखक आणि फुले, शाहू,आण्णाभाऊ,आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांच्या बैठकी घेऊन विचारमंथन करत आहोत.ज्यामुळे लवकरच महाराष्ट्रात वैचारिक,बौद्धिक व मानसिक दृष्ट्या मजबूत असा फुले,शाहू,आण्णाभाऊ,आंबेडकर विचाराचा पत्रकार संघ आणि प्रचार व प्रसार माध्यमे उभा करण्यास मदत होईल,असे सांगितले.यावेळी डी.एस सावंत साहेब यांच्या सविस्तर अशा प्रस्ताविका नंतर आजच्या या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित असलेले खिल्लारे साहेब,प्रा. खांडके,विद्यानंद वाघमारे,रवींद्र शिंदे,सुदेश माळाळे,उमाजी गायकवाड,साहित्यिक विजयकुमार गायकवाड,पृथ्वीराज चिलवंत,सोमनाथ मुंसुडे,लेखक संतोष कांबळे,कुंदन वाघमारे,आप्पासाहेब सिरसाटे,दादासाहेब बनसोडे,भारतीय बौद्ध महासभेचे ता.अध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव बाबासाहेब जानराव यांनी ही उपरोक्त विषयानुरूप आप-आपले मनोगत व्यक्त केले.ग्रा.प सदस्य गौतम सोनवणे,यशपाल सिरसाठे,निहार गायकवाड यांची ही उपस्थिती होती.या बैठकीचे संयोजन आणि आयोजन भारतीय बौध्द महासभेचे हिशोब तपासणीस देविदास कदम यांनी केले होते,तर या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार जागृती फाउंडेशनचे अध्यक्ष विजय अशोक बनसोडे यांनी मानले.
0 टिप्पण्या