Ticker

6/recent/ticker-posts

जुनी-कामठी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न


सचिन चौरसिया तालुका प्रतिनिधी रामटेक जि. नागपूर  मो. 9730901120

 रामटेक:- दिनांक २९ नोव्हेंबर २०२३ रोजी जुनी कामठी, ता.पारशिवनी येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत अ‍ॅड. आशिष जयस्वाल आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप जुनी कामठी येथील शिवमंदिर  येथे आयोजित करण्यात आले होते. महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डॉक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.या शिबिरात एकूण-२०६ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-३६,औषधी उपचारा करिता लाभार्थी-१६ व चष्मे करिता-१५४ लाभार्थींनी लाभ घेतला. 
या कार्यक्रम प्रसंगी श्री.कमलेशजी ठाकरे, श्री.पांडुरंगजी मेश्राम, श्री.विजयजी मेश्राम, श्री.पांडूजी वानखेडे, श्री.भूषणजी इंगोले, श्री.सदानंदजी ठाकरे, कुमार कावळे, सौ.छायाताई राजू भोयर,  सौ.निशाताई सायरे, सौ.प्रतिभाताई ठाकरे, सौ.मंगलाताई मारबते, अश्विनीताई कावळे, श्री.मनीष कमलेश ठाकरे, श्री.तुषार ठाकरे, श्री.पियुष महातो, श्री.प्रियंम ठाकरे, श्री.वैभव केवट, श्री.विनीत महातो, श्री.सुमित कामड़े व समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या