🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - ३० नोव्हेंबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. ९ मार्गशीर्ष १९४५
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : शरद
मास : कार्तिक
पक्ष : कृष्ण
तिथी : तृतीया (१४.३०) ~ चतुर्थी
वार: गुरूवार
नक्षत्र : आर्द्रा (१५.००) ~ पुनर्वसु
राशी : मिथुन
*संकष्ट चतुर्थी* (चंद्रोदय रात्री ८.३० वाजता.)
*स्वदेशीचे खंदे पुरस्कर्ते राजीव दीक्षित स्मृतीदिन*
२०१३: पाकिस्तान सरकारने सिक्रेट पाकिस्तान नावाचा माहितीपट दाखविल्यामुळे बीबीसी च्या प्रसारणावर स्थगिती आणली होती.
२००८: आतंकवादी हल्या नंतर भारत सरकारने फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी ला स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
२००४: बांगलादेशच्या लोकसभेत महिलांसाठी ४५ टक्के राखीव जागेचे विधेयक मंजूर झाले.
२००२: आय सी सी ने झिम्बाब्वे मध्ये न खेळणाऱ्या देशांवर कारवाई होऊ शकते अशी घोषणा केली.
२०००:पाच अंतराळवीर आणि महाकाय सौरपंखे घेऊन ’एन्डेव्हर’ या अंतराळयानाने फ्लोरिडातील केप कॅनव्हेरॉल येथून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकाच्या दिशेने उड्डाण केले.
२०००: भारतीय चित्रपट सृष्टीची कलाकार प्रियंका चोपडा मिस वर्ल्ड झाली
१९९८: एक्सॉन आणि मोबिल यांच्यामध्ये ७३.७ बिलियन डॉलर्सचा करार झाल्यामुळे एक्सॉनमोबिल ही जगातील सर्वात मोठी कंपनी झाली.
१९९६:ख्यातनाम साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला ’महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ प्रदान. हा महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
१९९४: आजच्या दिवशी सोमालिया च्या जवळ आशि लॉरो नावाचे एक पर्यटक जहाज आग लागून समुद्रात बुडाले
१९६५: प्रसिद्ध व्यंगचित्रकार शंकर पिल्लई यांनी दिल्लीला बाहुल्यांच्या संग्रलायाची स्थापना केली.
१९६१: १९५९ मध्ये प्रकाशित आल्हाद चित्रच्या सांगत्ये ऐका या बोलपटाने पुणे येथील विजयानंद सिनेमागृहात ५५१ दिवस चालण्याचा विक्रम केला.
१९३९: सोव्हिएत युनियन ने सीमा विवादामुळे फिनलंड वर आक्रमण केले.
१९१७: कलकत्ता येथे आचार्य जगदीश चंद्र बोस इन्स्टिट्युटची स्थापना.
१८७२:हॅमिल्टन क्रिसेंट, ग्लासगो येथे स्कॉटलंड व इंग्लंड यांच्यामधे जगातील पहिला आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामना खेळण्यात आला.
१७३१: चीनच्या बीजिंगला झालेल्या भूकंपात एक लाख लोक मरण पावले होते.
जन्मदिवस :
१९६७:राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
१९४५:वाणी जयराम – पार्श्वगायिका
१९३६: पार्श्वगायिका सुधा मल्होत्रा.
१९३५:आनंद यादव – लेखक
१९१०:कविवर्य बा. भ. बोरकर ऊर्फ ’बाकीबाब’
१८७४:विन्स्टन चर्चिल – दुसर्या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते
१८५८:जगदीशचंद्र बोस – महान
भारतीय वनस्पतीशास्त्रज्ञ, वनस्पतींमधील प्रतिक्षिप्त क्रियांवर मूलभूत संशोधन
१८३५:मार्क ट्वेन – विख्यात अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार
१७६१:स्मिथसन टेनांट – हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ. त्यांनी ऑस्मिअम व इरिडिअम या मूलद्रव्यांचा शोध लावला. त्यांच्या सन्मानार्थ तांब्याच्या एका धातुकाला टेन्नाटाईट (Cu12As4S13) असे नाव दिले आहे.
मृत्यूदिन :
२०१४: अरुणाचल प्रदेशचे ७ वे मुख्यमंत्री जर्बोम गॅमलिन
२०१२: इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान
२०१०: राजीव दिक्षीत – सामाजिक कार्यकर्ता
१९९५:वामनराव कृष्णाजी तथा वा. कृ. चोरघडे – साहित्यिक, विचारवंत व स्वातंत्र्यसैनिक
१९००:ऑस्कर वाईल्ड – आयरिश लेखक व नाटककार
*।। दास-वाणी ।।*
भूमंडळापासून उत्पत्ती ।
जीव नेणो जाले किती ।
परंतु ब्रह्म आदिअंती ।
व्यापूनि आहे ।।
जे जे कांही निर्माण जालें ।
तें तें अवघेचि नासलें ।
परी मुळीं ब्रह्म तें संचलें ।
जैसें तैसें ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०६/०३/१४-१५
या पृथ्वीवर आजतागायत किती जीव निर्माण झाले याची गणतीच नाही. ते जीव सर्व नष्ट झाले. परब्रह्म मात्र आकाशाच्याही आधी आणि पृथ्वीच्या अंती देखील सर्वत्र जसेच्या तसे व्यापून राहिलेले असते.
जे जे निर्माण होते त्या प्रत्येकाला कधी ना कधी नाश हा असतोच. 'उपजे ते नाशे|' हा सृष्टीचा नियमच!
कारण पंचमहाभूते ही मायेपासून निर्माण होतात. परब्रह्म मात्र स्वयंभू आहे. अनादी आद्य आहे. ते नित्य आणि सत्य आहे. जसेच्या तसे सर्वत्र
व्यापूनही वर शिल्लकच राहाते.
मायोद्भवनिरूपण समास.
*विशेष*
विजयी झाल्यावर दोन बोटांनी *V* दाखवण्याची पद्धत इंग्लंडचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी सर्वप्रथम लोकप्रिय केली. दुसर्या महायुद्धाची घोषणा झाल्यानंतर विन्स्टन चर्चिल यांनी संसदेत ऐतिहासिक भाषण केले. त्यात इंग्लंडचे अंतिम ध्येय फक्त विजय असेल हे सांगताना त्यांनी आवेशात दोन बोटे उंचावून *V* हे विजयचिन्ह दर्शविले.
🙏💐💐💐💐💐🙏
0 टिप्पण्या