🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २४ नोव्हेंबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. ३ मार्गशीर्ष १९४५
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : शरद
मास : कार्तिक
, पक्ष : शुक्ल
तिथी : द्वादशी (१९.००) ~ त्रयोदशी
वार: शुक्रवार
नक्षत्र : रेवती (१६.००) ~ अश्विनी
राशी : मीन (१६.००) ~ मेष
*प्रदोष*
*चातुर्मास समाप्ती*
*तुलसीविवाह प्रारंभ*
*गुरू तेगबहादूर बलिदान दिन*
(विशेष माहिती साठी दुवा वर दिला आहे. कृपया पहावे.)
उत्क्रांती दिन
१४३४: थेम्स नदी पूर्णपणे गोठली.
१७५०:महाराणी ताराबाईंकडून छत्रपती राजारामास कैद
१८५९:चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ प्रकाशित केला.
१८६४: जळगाव नगरपालिकेची स्थापना.
१९४४: दुसरे महायुद्ध – ८८ अमेरिकन विमानांनी टोकियोवर तुफानी बॉम्बवर्षाव केला.
१९६३: जॉन एफ. केनेडी यांचा खून करणाऱ्या ली. हार्वे ऑसवाल्ड याचा डॅलस पोलीस स्थानकात जॅक रुबी ने खून केला.
१९६९: अपोलो-१२ चंद्रावर उतरले.
१९७१: डी. बी. कुपर याने चोरलेल्या २ लाख अमेरिकन डॉलर सह नॉर्थवेस्ट ओरीएंट एरलाईन्सच्या विमानातून पॅराशूटच्या सहाय्याने उडी मारली. परंतु कुपारचा अद्याप शोध लागलेला नाही.
१९७६: तुर्कस्तानच्या पूर्व भागात भीषण भूकंप. ४ ते ५ हजार लोक मृत्यूमुखी!
२००१: स्थानिक पोलीस,सैन्य व माओवादी यांच्यात चकमक होऊन ३८ पोलीस व सैनिक मारले गेले.
जन्मदिवस :
१९६१:अरुंधती रॉय – बुकर प्राप्त लेखिका व विवादीत मानवाधिकार कार्यकर्त्या
१९३७: मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम
१९१४:लिन चॅडविक – ब्रिटिश शिल्पकार, लोखंड, पोलाद, पितळ, प्लॅस्टर, काच आदी माध्यमांचा उपयोग करुन त्यांनी शिल्पे घडविली.
मृत्यूदिन :
१६७५:गुरू तेग बहादूर – शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत.
१९१६: मॅक्सिम तोफेचे शोधक हिराम मॅक्सिम
१९६३:महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री
मारोतराव सांबशिव कन्नमवार यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले.
२००३:उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका
२००४: जगप्रसिद्ध लेखक आर्थर हेली यांचे निधन.
२०१४: भारतीय राजकारणी मुरली देवरा
*।। दास-वाणी ।।*
न कळे जीवाचे जन्ममूळ ।
न कळे साधनांचे फळ ।
न कळे तत्वता केवळ ।
या नाव बद्ध ।।
न कळे कैसे ते बंधन ।
न कळे मुक्तीचें लक्षण ।
न कळे वस्तू विलक्षण ।
या नांव बद्ध ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०७/१५-१६
जीवाचे चार प्रकार. बद्ध,मुमुक्षु, साधक, सिद्ध.
जो प्रपंच, संसारामधे मी आणि माझे यामधेच मशगुल असल्याने जीव कशाला जन्मतो, जीवाचे जगदीश्वराशी नाते काय, जीवाचे या भूतलावर कार्य नेमके काय याविषय़ी अनभिज्ञ असतो. साधना कशी करावी त्याचे फळ काय, केवल ब्रह्मापर्यंत साधनेतून पोहोचता येते, याची जाणीवही ज्याला नाही तो बद्ध किंवा बांधलेला.
जीवाला बंधन जे वाटते ते मायेचे आहे. मुक्तीकडे वाटचालीला हे बंधन अडथळा आहे. विलक्षण म्हणजे नाम रूपाच्याही पलीकडील ते परब्रह्म हेच आपले इप्सित आहे. हे न समजता ऐषाराम, सत्तासंपत्ती, भोगविलासात रमतो. पुढील जन्मीही असेच आयुष्य लाभो अशी इच्छा करतो तो बद्ध म्हणजे बांधून घेतलेला.
बद्धलक्षण समास.
🙏💐💐💐💐💐🙏
0 टिप्पण्या