Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞‌

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२३ - ७ नोव्हेंबर 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. १६ कार्तिक १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   शरद
मास :  आश्विन  
पक्ष :  कृष्ण  
तिथी : दशमी              
वार:   मंगळवार
नक्षत्र : मघा (१६.२०) ~ पूर्वा    
राशी :   सिंह.

*डॉ. सी. व्ही. रामण जयंती*

*राष्ट्रीय कर्करोग जागृती दिन*

१६६५: सर्वात जुने जर्नल लंडन गॅझेट पहिल्यांदा प्रकाशित झाले.
१८७५: सुजलाम् सुफलाम्, मलयज शीतलाम्, सश्यशामलाम्, मातरम् वंदे…! वंदे मातरम् असे भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादवचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
१८७९: वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप (काळ्यापाण्याची) शिक्षा ठोठवण्यात आली.
१९३६: प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात रिलीज झाला.
२००१: बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतुक कंपनी सबीना (SABENA) दिवाळखोरीत गेली.

जन्मदिवस :
१९८१: भारतीय अभिनेत्री अनुष्का शेट्टी
१९५४:कमल हसन – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक 
१९००: प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू ऊर्फ ’एन. जी. रंगा’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते 
१८८८:सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ 
१८८४:डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार 
१८७९:लिऑन ट्रॉट्स्की – रशियन क्रांतिकारक 
१८६८: मोरो केशव दामले – व्याकरणकार व निबंधकार.
१८६७:मेरी क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ 
१८५८:बिपिन चंद्र पाल – ’लाल-बाल-पाल’ या त्रयीतील स्वातंत्र्यसेनानी 

मृत्यूदिन :
१५६२: मारवाडचे राव मालदेव राठोड.
१९०५: कृष्णाजी केशव दामले तथा ’केशवसुत’ – मराठी काव्याचे प्रवर्तक. त्यांच्या सुमारे १३५ कविता आज उपलब्ध आहेत. त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही. ’केशवसुतांची कविता’ हा त्यांचा कवितासंग्रह त्यांच्या निधनानंतर ह. ना. आपटे यांनी प्रकाशित केला. त्यांच्या ’तुतारी’, ’नवा शिपाई’, ’गोफण केली छान’ इ. कविता प्रसिद्ध आहेत.
१९६३:यशवंत गोपाळ तथा य. गो. जोशी – मराठी लघुकथाकार व ’प्रसाद’ मासिकाचे संपादक. ’वहिनीच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’ या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले. ’दुधाची घागर’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. 
१९८१:विल डुरांट – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ 
१९९८:पं. जितेंद्र अभिषेकी – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक 
२०००:सी. सुब्रम्हण्यम – गांधीवादी नेते, केन्द्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल 
२००९: सुनीता देशपांडे, स्वातंत्र्य सेनानी व लेखिका. 
२०१५: भारतीय दिग्दर्शक आणि कवी बाप्पादित्य बंदोपाध्याय.

*।। दास-वाणी ।।* 

याकारणें ज्ञानासमान । 
पवित्र उत्तम न दिसे अन्य । 
म्हणौन आधी आत्मज्ञान । 
साधिलें पाहिजे  ।। 

सकळ उपदेशीं विशेष । 
आत्मज्ञानाचा उपदेश । 
येविषईं जगदीश । 
बहुतां ठाईं बोलिला  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०५/०४/३२-३३ 

या जगातील सगळी शास्त्रे आत्मसात करा. सर्व दैवतांच्या यथासांग प्रदीर्घ उपासना करा. भगवंतापाशी पोहोचण्यासाठी ही उत्तम साधने आहेत. तरीदेखील 
न हि ज्ञानेन सदृशं पवित्रं इह विद्यते । 
म्हणून आत्मज्ञानाइतके पवित्र असे दुसरे काहीच नाही. आत्मज्ञानापेक्षा श्रेष्ठ असेही काहीच असत नाही. म्हणून आधी आत्मज्ञानप्राप्तीच साधली पाहिजे.

मंत्र तंत्र जप जाप्य तीर्थाटन यापैकी कोणत्याही उपदेशांमधून केलेल्या कृतीपेक्षा गुरूमुखांतून झालेला आत्मज्ञानाचा उपदेशच सर्वश्रेष्ठ असून मुक्तीचा तो एकमेव मार्ग आहे असे भगवंतांनी अनेक ठिकाणी सांगितले आहे.
मयि एव मन आधत्स्व ।
मयि बुद्धी निवेशय । 
माझ्या ठायीच मन आणि बुद्धी एकरूप कर. तू आत्मज्ञानी सहजच होशील. असा साधकाला भगवंत उपदेश करतात.

उपदेशलक्षण समास.

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या