🌞 दिन विशेष 🌞
इसवी सन २०२३ - २० नोव्हेंबर
शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत २०८०
भा. रा. २९ कार्तिक १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू : शरद
मास : कार्तिक
पक्ष : शुक्ल
तिथी : अष्टमी (२७.१०) ~ नवमी
वार: सोमवार
नक्षत्र : धनिष्ठा (२१.२०) ~ शततारका
राशी : मकर (१०.१०) ~ कुंभ लृसहकारी
दुर्गाष्टमी
गोपाष्टमी
*प.पू. शंकर महाराज पुण्यतिथी*, पुणे.
*आंतरराष्ट्रीय बाल दिन*
२००८:अमेरिकेतील आर्थिक संकटामुळे ’डाऊ जोन्स’ निर्देशांक १९९७ पासूनच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.
१९९९:आर. जी. जोशी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा ’राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक मोरोपंत पिंगळे यांना जाहीर
१९९८:’इंटरनॅशनल स्पेस स्टेशन’चे (ISS) प्रक्षेपण झाले.
१९९७:अमेरिकेच्या ‘कोलंबीया' अंतराळयानातून कल्पना चावला ही पहिली भारतीय महिला अंतराळयात्री आपल्या पहिल्या अवकाशमोहिमेवर रवाना झाली.
१७८९:न्यूजर्सी अमेरिकेचे पहिले राज्य बनले.
जन्मदिवस :
१९८९: भारतीय महिला कुस्तीपटू बबिता फोगाट
१९६९: अभिनेत्री शिल्पा शिरोडकर
१९३९: साहित्यिक वसंत पोतदार
१९२७:चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी – मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, वकील, लेखक, स्वातंत्र्यसैनिक, पद्मभूषण
१९०५:मिनोचर रुस्तुम तथा ’मिनू’ मसानी – संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्र पक्षाचे नेते
१८९२: इंसुलिन चे सहसंशोधक जेम्स कॉलिप
मृत्यूदिन:
१९९९: तमाशा कलावंत (सोंगाड्या) दत्ता महाडिक पुणेकर
१९९८: संस्कृतच्या विविध शास्त्रांतील पंडित, प्रख्यात मीमांसक दत्तात्रेय शास्त्री तांबे गुरूजी
१९९७:शांताराम शिवराम तथा आचार्य बाळाराव सावरकर – स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांचे स्वीय सहाय्यक (कोणतेही नाते नव्हते), हिन्दू महासभेचे अध्यक्ष
१९८९:’गानहिरा’ हिराबाई बडोदेकर – भारतीय संगीत क्षेत्रातील अध्वर्यू.
१९७३:केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते
१९१०:लिओ टॉलस्टॉय – रशियन लेखक
१९०८: बंगालमधील सुप्रसिद्ध क्रांतिकारक कन्हय्यालाल दत्त यांना फाशी.
१८५९:माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार.
*।। दास-वाणी ।।*
सद् गुरूचेनि असत्छिष्य पालटे ।
परंतु सच्छिष्ये असद् गुरू न पालटे ।
कां जें थोरपण तुटें ।
म्हणौनिया ।।
याकारणें सद् गुरू पाहिजे ।
तरीच सन्मार्ग लाहिजे ।
नाहीं तरी होईजे ।
पाषांडा वरपडे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
दासबोध : ०५/०३/१६-१७
शिष्य चांगला नसेल तर सद्गुरू त्याला निश्चितच योग्य मार्गावर आणून सोडू शकतो. परंतु ज्ञानमार्गाचा अधिकारी असलेला शिष्य हा अनधिकारी गुरूला सन्मार्गावर आणू शकत नाही. कारण इथे शिष्याला तो अधिकारच नाही. यासाठी शिष्याने अधिकारी गुरूच करावा.
यासाठी शिष्याला सद् गुरूच अनिवार्य आहे. तरच साधक सन्मार्गाला लागेल. ते नसतील तर मार्ग भरकटतो. पाखंडीपणा वाढतो. परमार्थ दूरच राहातो.
शिष्यलक्षण समास.
🙏💐💐💐💐💐🙏
0 टिप्पण्या