Ticker

6/recent/ticker-posts

आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष देशभरात लोकसभेच्या 25 जागा लढविणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले


 

चित्रा न्युज प्रतिनिधी
नवी दिल्ली   - आगामी  2024 च्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) ला पाठींबा राहणार आहे. एन.डी.ए.चा घटक पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे. देशभरात रिपब्लिकन पक्षाचे  28 राज्य आणि 8 केंद्रशासीत प्रदेशात  संघटन वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष  लोकसभेच्या 25 जागा लढविणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केली.  
 नवी दिल्लीतील कॉन्स्टीटयुशन क्लब येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या  राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक घेण्यात आली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना ना.रामदास आठवले यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात रिपब्लिकन पक्ष लोकसभेच्या 25 जागा लढविणार असल्याची घोषणा केली.  
 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) देशभरातील 28 राज्य आणि 8 केंद्रशासीत प्रदेशातील कार्यकारणीच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा आज झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ना. रामदास आठवले यांनी घेतला.  आगामी मार्च  2024 पर्यंत सर्व राज्यांच्या कार्यकारणींचा अहवाल आणि किमान 5 लाख क्रियाशील सदस्य बनविण्याचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश ना. रामदास आठवले यांनी आज कार्यकर्त्यांना दिली. देशभरातील विविध राज्यांत रिपब्लिकन पक्षाच्या कामाचा आढावा ना.रामदास आठवले यांनी घेतला. त्यावेळी अनेक राज्यांत रिपब्लिकन पक्षाचा जनाधार वाढलेला आहे. अनेक राज्यात स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर दलित, आदिवासी महिला यांच्या प्रश्नांबाबत वेळोवेळी घडणा-या घडामोडींवर आणि घटनांवर विविध प्रश्नांवर रिपब्लिकन पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्यापरीने आंदोलन करण्याच्या सुचना ना. रामदास आठवले यांनी दिल्या.  

अनेक राज्यात लोकसभा निवडणुक लढण्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. अनेक राज्यांमध्ये चांगले तुल्यबळ उमेदवार रिपब्लिकन पक्षाकडे असून आगामी लोकसभा निवडणुकीत देशभरात किमान 25 जागा लढण्याची रिपब्लिकन पक्षाची तयारी आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष नक्कीच लोकसभेत खाते उघडणार असा निर्धार यावेळी ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. 

या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीला महाराष्ट्रातुन रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, सौ.सीमाताई आठवले,  शिलाताई गांगुर्डे, ऍड .बी के बर्वे; विनोद निकाळजे; अनिल गांगुर्डे, दयाल बहादुरे,  सुनिल मोरे,घनश्याम चिरणकर; डॉ.प्रीतिष जळगावकर; तसेच  कर्नाटक चे वेंकटस्वामी;प्रदेशचे ब्रम्हानंद रेड्डी,  केरळ चे राजीव मेनन; छत्तीसगड च्या उषा आफळे; तेलंगणाचे परम शिवा नागेश्वर राव ; रवि पसूला, कोमपल्ली प्रभूदास; गोरख सिंग;  उत्तर भारताच्या मंजु छिबेर, उत्तरप्रदेशचे राहुलन आंबेडकर, गुजरात चे अशोककुमार भट्टी; जतीन भुट्टा;  शुक्ला; राजस्थानचे नवरतन गोसाईवाल, मणिपुरचे महेश थनंजम आदि अनेक मान्यंवर या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उपस्थित होते.  


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या