Ticker

6/recent/ticker-posts

तिरोडा ते चांदपूर पायदळ वारी.


प्रवीण शेंडे जा. संपादक चित्रा न्यूज महाराष्ट्र राज्य.
मो.9834486558

गोंदिया -तिरोडा दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा श्रीराम नवमी शोभा यात्रा नगर उत्सव समिती तिरोडा द्वारा तिरोडा ते चांदपूर पायदळ वारी चे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी या आयोजनाचे महत्व वाढताच चालले आहे या पायदळ वारीत शहरातील तसेच अजु बाजू च्या गावातील हनुमान भक्त मोठ्या संख्येने सहभाग घेत असतात. पायदळ वारी ही श्रीराम गजानन मंदिर स्टेशन रोड इथून प्रारंभ होत असते आणि वीस ते पंचवीस किलोमीटर चा प्रवास पायदळ वारी करीत चांदपूर  देवस्थान इथे समापन होत असते, समापन झाल्यावर भोजन दानाचे चे सुद्धा आयोजन श्रीराम नवमी उत्सव समिती कडून करण्यात येत असतो, या पायदळ वारीत भाविकांना सहभाग घेण्याचे आव्हान समिती ने केले आहे. अशी माहिती श्रीराम नवमी उत्सव समिती तिरोडा च्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या