Ticker

6/recent/ticker-posts

वंचित बहुजन आघाडी मध्ये असंख्य कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश


लिंगोजी कदम  जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड मो  9689821132


 नांदेड :-जिल्ह्यात बीएसपी पक्षाला मोठे खिंडार...
 BSP पक्षाचे प्रदेश सचिव, जिल्हा प्रभारी आणि 
नांदेड जिल्हा युवकांची धडकन विकी वाघमारे यांचा
वंचित बहुजन आघाडी मध्ये आपल्या असंख्य कार्यकर्ते व विविध पक्ष संघटनेच्या  पदाधिकाऱ्यांनी जिल्हाध्यक्ष राजेश्वर पालमकर यांच्या नेतृत्वात जाहीर प्रवेश केला
दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात विविध पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी VBA जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे पालमकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून. VBA मिशन 2024 नांदेड जिल्हा (उत्तर) अंतर्गत इतर पक्षात आंबेडकरी विचारधारा घेऊन काम करणारे कार्यकर्ते, विविध पक्ष संघटनेतील पदाधिकारी, यांचा मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्षप्रवेश होत आहे.
वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ताकद वाढली असून,नांदेड जिल्ह्यातील  BSP पार्टीला मोठ्या प्रमाणामध्ये खिंडार पडले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे आज नांदेड जिल्ह्यात मोठा भूकंप झाला आहे. विविध राजकीय पक्षात प्रस्थापितांचे टेन्शन वाढवणारा हा कार्यक्रम होता. नांदेड शासकीय विश्रामगृहातील सभागृहात शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, अक्षरशा सभागृहात बसण्यासाठी जागा नव्हती, एवढे सभागृह खचाखच भरले होते. या कार्यक्रमास महिलांची संख्या भरपूर होती.

बीएसपी चे माजी महाराष्ट्र प्रदेश सचिव विठ्ठल घोडके, तसेच नांदेड जिल्हा प्रभारी माधवराव शिंदे , बीएसपीचे युवा नांदेड जिल्हा अध्यक्ष तथा नांदेड जिल्ह्यातील युवकांची धडकन असणारे विकी वाघमारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन असंख्य तरुणासह वंचित बहुजन आघाडी मध्ये आज जाहीर प्रवेश केला. 
 पंडित आढाव यांनी आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनेतले पदाधिकारी यांच्यासह वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेश सोहळ्यास जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबेरे पालमकर, शैलेश लवटे (जिल्हामहासचिव), नंदन नांगरे (जिल्हा उपाध्यक्ष), जिल्हा पदाधिकारी लक्ष्मण पांचाळ, अमर हत्तीआंबिरे या सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वरील विविध पक्ष संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास देविदास हादवे, राजू भांडे, रविराज दुधकवडे, हिदायतखान पठाण, गोविंद गोखले, दिलीप राव, मोहन कांबळे, मुकुंद नरवाडे, एड. गायकवाड  एड. पुनीत हनवटे, योगेश लव्हाळे, शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या